लाखेवाडी येथे शैक्षणिक संकलनाचा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते उदघाटन
निरा नरसिंहपूर (बारामती झटका) बाळासाहेब सुतार यांजकडून
लाखेवाडी येथील शैक्षणिक संकलनाच्या उद्घाटन व शेतकरी मेळाव्या निमित्त केंद्रीय माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब बोलत होते. पुढे ते म्हणाले, दत्तामामा भरणे यांनी काहीना काही इंदापूर तालुक्यासाठी कोणत्या ना कोणत्या मंत्र्याकडे जाऊन इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी निधी कसा आणता येईल यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असतात. परंतु, मामांकडे मंत्रिमंडळातील सात प्रमुख खाती आहेत. बांधकाम विभागाअंतर्गत बाराशे साठ कोटी रुपयांची कामे केली. पानंद रस्त्यासाठी 38 कोटी रुपये निधी आणून 152 किलोमीटर, पानंद रस्ते केले. जलजीवन मशीनसाठी 128 कोटी रुपये निधी आणला. इंदापूर शहरासाठी वीस कोटी, सामाजिक न्याय विभागाकडून 20 कोटी असे अनेक कोटी रुपयांचा विकासनिधी इंदापूर तालुक्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणत आहेत. बावीस गावाच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लावण्याचे काम मंत्रिमंडळाच्या सहकार्याने करता येईल. शिक्षण संकुलामूळे राज्यातील काही मोजक्या दर्जेदार शैक्षणिक संकुलाच्या कक्षेत येत असून ग्रामीण भागातील शिक्षणाचा कायापालट करण्याचे काम झाले असल्याचे प्रतिपादन खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केले.
लाखेवाडी येथील जय भवानी गड विकास प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन, पक्ष प्रवेश व भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, आमदार यशवंत माने, संजय शिंदे, प्रा. दिगांबर दुर्गाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुका अध्यक्ष हणमंतराव कोकाटे, उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, संजय गांधी योजनेचे तालुका अध्यक्ष सागरबाबा मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, पुर्वी मनी व मसल पावरच्या जिवावर कोणी काहीही करायचे परंतू, सध्याला नाॅलेजला महत्व आले आहे. तुमच्याकडे नाॅलेज असेल तर सगळंच तुमच्या पायाशी लोटांगण घालेल. काळ बदललाय तुम्ही काळाप्रमाणे सुसंगत वागाल तर स्पर्धेत टिकून राहाल.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, होत्याचे नव्हते व नव्हत्याचे होते करण्याची ताकद फक्त देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मध्येच आहे. राज्यात 64 आमदारांचा मुख्यमंत्री 54 आमदारांचा उपमुख्यमंत्री व 44 आमदारांचे मंत्री तर 105 आमदारांचा विरोधी पक्ष नेता तयार करण्याचे काम फक्त शरदचंद्रजी पवार साहेबच करू शकतात. त्यामुळे त्यांच्या संस्कारात राहिल्यामुळे मला देखील आता अंडीपिल्ली कळायला लागली आहेत.
जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत ढोले म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांच्या बावीस गावांच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा. तसेच आम्ही पक्ष प्रवेश केल्यामुळे आमच्यावर खोट्यानाट्या केसेस दाखल केल्या जातील याचा बंदोबस्त व्हावा. तसेच या भागातील शेतकऱ्यांना ऊस गाळपाची हमी मिळावी, अशा अनेक गोष्टींमुळे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, दीपक जाधव यांची भाषण झाले. यावेळी तानाजी देवकर वकिल, बाळासाहेब पाटील, नंदकुमार गायकवाड, सुनील जगताप, उस्मान शेख, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाचे स्वागत उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले व अनिल रुपनवर तर आभार तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng