प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या शाखा उद्घाटनप्रसंगी रणरागिनी संजीवनीताई बारंगुळे यांची तोफ धडाडणार.
माळशिरस ( बारामती झटका )
महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदा शालेय शिक्षण राज्यमंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटना यांच्या दोन शाखेचे उद्घाटन एकशिव ता. माळशिरस येथे होत असल्याने प्रहार संघटनेची मुहूर्तमेढ माळशिरस तालुक्यात रोवली जाणार आहे. शाखा उद्घाटन प्रसंगी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या जिल्हाध्यक्ष रणरागिनी सौ. संजीवनीताई बारंगुळे यांची तोफ धडाडणार आहे.
“अन्यायावर वार न्यायासाठी प्रहार” या ब्रीद वाक्याने प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटना यांचे कार्य राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सुरू आहे. जय प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या दोन्ही शाखांचे उद्घाटन एकशिव ता. माळशिरस येथे रविवार दि. 09/01/2022 रोजी दुपारी 4 वा. सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, शहराध्यक्ष सोलापूर अजित भाऊ कुलकर्णी, अपंग क्रांती आंदोलन जिल्हाध्यक्षा सौ. संजीवनीताई बारंगुळे यांच्या शुभहस्ते दोन्ही शाखांचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी सोलापूर शहर संपर्कप्रमुख जमीरभाई शेख, कार्याध्यक्ष सोलापूर शहर खालिद मनियार, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शहाजीराव माने देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे, जिल्हाध्यक्ष प्रहार औद्योगिक संघटना केशव जांभळे, जिल्हा कार्याध्यक्ष औद्योगिक संघटना दिलीप ननवरे, युवा जिल्हाध्यक्ष संतोष पवार, जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे, माळशिरस तालुका अध्यक्ष गोरख जानकर, तालुका उपाध्यक्ष संजयभाऊ पवळ, सेक्ष्य रोहित साठे, जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील, युवा उद्योजक सतीशतात्या ढेकळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी प्रहार जनशक्ती पक्ष व जय प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन या दोन्ही शाखांच्या उद्घाटन प्रसंगी माळशिरस तालुक्यातील बच्चुभाऊ प्रेमींनी उपस्थित राहावे, असे विठ्ठल वाघमोडे व संभाजी गावडे यांनी आवाहन केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng