कोल्हापूर (बारामती झटका)
नुकत्याच झालेल्या रेंदाळ किराणा व व्यापारी असोसिएशन (रजि.) रेंदाळ या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू विद्यासागर विठ्ठल महाजन यांची खेळामधील रूचि आणि कामगिरी पाहून बहुमानपुर्वक सत्कार करण्यात आला. विद्यासागर हा सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीकडुन दि. 10 ऑक्टोंबर 2021 ला झालेल्या राज्यस्तरीय यल्बो बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून विजेता ठरला आणि त्याने टायटल बेल्ट हा किताब पटकाविला.
विद्यासागरने सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश निराळे सर, सचिव निलेश परीट सर व खजिनदार सुशांत माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे U19+ सीनियर कॅटेगिरीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत होता. या स्पर्धेमध्ये राज्याच्या विविध भागातील यल्बो बॉक्सिंगमध्ये महारत असणारे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. तरी विद्यासागरने सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीचे व कोल्हापूर जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर जाऊन गाजवीले म्हणून विद्यासागरचा रेंदाळ किराणा व व्यापारी असोसिएशन (रजि.) रेंदाळ यांच्या माध्यमातून दि. 8/02/2022 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बहुमानपुर्वक सत्कार करण्यात आला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng