मुंबई (बारामती झटका)
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ता, रविकांत वरपे यांनी ट्वीट करून केंद्र सरकारला राज्याच्या ह हक्काचे पैसे वेळेत का मिळत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
केंद्र सरकारकडे मार्च २०२२ पर्यंत GST २९,६४७ कोटी रुपये येणे बाकी होते. त्यातून १४,१४५ कोटी रुपये दिले. पण २०१९-२० चे १०२९ कोटी, २०२०-२१ चे ६४७० कोटी, २०२१-२२ चे ८००३ कोटी अशी एकूण १६,५०२ कोटी बाकी आहे. हे सर्व पैसे हे राज्याच्या हक्काचे असून वेळेत मिळत नाही, असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng