रामनवमी उत्सवात प्रभू श्रीरामाचे आधुनिक युगातील रामाने मनोभावे दर्शन घेतले.

फोंडशिरस येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे राम भक्तांकडून जंगी स्वागत.

फोंडशिरस ( बारामती झटका )

फोंडशिरस ता. माळशिरस येथे सालाबादप्रमाणे रामनवमी उत्सव मोठ्या थाटामाटात व भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला. राम नवमी उत्साहात प्रभू श्रीरामाचे आधुनिक युगातील रामाने मनोभावे दर्शन घेतले. रामनवमीनिमित्त येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार आमदार राम सातपुते यांचे राम भक्तांकडून जंगी स्वागत झाले.

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे श्री प्रभू रामचंद्राच्या नगरीमध्ये आगमन होताच राम भक्तांनी ढोल, हलगी, ताशाच्या गजर वाद्यांमध्ये जंगी स्वागत केले. सर्व उत्साही कार्यकर्त्यांसमवेत वाजत गाजत उपस्थित लोकांचा राम राम घेत राम राम करीत श्री प्रभू रामचंद्राचे आधुनिक युगातील रामाने मनोभावे दर्शन घेतले.

फोंडशिरस येथे रामनवमी उत्सव मोठ्या थाटामाटात व भक्तिमय वातावरणात संपन्न झालेला आहे. यावेळी आ. राम सातपुते यांनी फोंडशिरस गावातील उत्साही कार्यकर्त्यांशी हितगूज साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. अनेक लोकांच्या अडचणी व प्रश्नांची सोडवणूक करून पुढील कार्यक्रमासाठी लोकप्रिय आमदार राम सातपुते रवाना झाले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवेळापूर विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गट विजयी तर विरोधी गटाचा उडाला धुव्वा…
Next articleअकलूज उपजिल्हा रुग्णालयात भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here