रामराजे यांना जलजीवन योजनेचे भूमिपूजन करताना लाज कशी वाटत नाही ? – खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर.

माढा लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी झंजावाती जनसंपर्क व जनसंवाद दौरा केला.

फलटण ( बारामती झटका )

केंद्र सरकारची जनजीवन योजना आहे. त्या योजनेचा प्रमुख आहे मंजूर करून आम्ही आणायचे आणि भूमिपूजन रामराजे यांनी करायचे. भूमिपूजन करीत असताना लाज कशी वाटत नाही, असा थेट सवाल माढा लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यात झंजावाती जनसंपर्क व जनसंवाद दौरा करताना हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील बीबी गावातील जनतेच्या सुसंवादानंतर मार्गदर्शनपर बोलताना परखड विचार व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर स्वराज्य नागरी पतसंस्थेचे चेअरमन युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादतात्या साळुंखे, फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते व विद्यमान नगरसेवक अनुपशेठ शहा, भारतीय जनता युवा मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष युवा नेते सुशांतराजे निंबाळकर, सातारा जिल्हा संघटन सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, संयोजक डॉ. विशाल बोबडे यांच्यासह जिल्हा परिषद गटातील व पंचक्रोशीतील पदाधिकारी व नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्तव्यदक्ष लोकप्रिय खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारसंघातील अडीअडचणी व विकास कामांविषयी चर्चा करण्यासाठी झंजावाती दौरा आयोजित केलेला होता. अनेक ठिकाणी एमएसईबी, पाणंद रस्ता, पाणीपुरवठा, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे, भूसंपादन जमिनीचा मोबदला, याविषयी नागरिकांनी अडचणी सांगितल्या होत्या.

जनसंपर्क दौऱ्यासोबत सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. एमएसईबी च्या अधिकाऱ्यांच्या डीपीविषयी व लाईट बिलाच्या अडचणी सांगितल्यानंतर खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना तालुक्यामध्ये सर्वे करा, किती डीपी आवश्यक आहे, त्याची माहिती द्या आणि शेतकऱ्यांनी सुद्धा एमएससीबी ला सहकार्य करून लाईट बिल भरण्याच्या सूचना केल्या. तालुक्यात डीपी चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा नवीन माणसांच्या बारीक हालचालीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

जलजीवन योजनेतील भूमिपूजन विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केलेले असल्याचे नागरिकांनी सांगितल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपस्थितांना सांगितले की, तुम्ही मंजूर केले असेल तर पत्र दाखवा, असा सवाल उपस्थित करून बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला असे म्हणत आम्ही मंजूर केलेल्या योजनेचे उद्घाटन करायला रामराजे यांना लाज कशी वाटत नाही ?, असा सवाल उपस्थित केला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जनसंवाद यात्रा सुरू आहे. तालुक्यातील निरा देवधर, धोम बलकवडी पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे. तालुक्यातून अनेक महामार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. फलटणपर्यंत रेल्वे मार्ग आलेला आहे. पंढरपूर पर्यंत लवकरच जोडला जाणार आहे. केंद्रात आणि राज्यात सरकार आपले आहे. महाराष्ट्रातील महाभकास आघाडीचे दरिद्री सरकार जाऊन भाजपचे सरकार आलेले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचेकडून तालुक्यासाठी डीपी मंजूर करून अनेक समस्या सोडविल्या जातील. आपले मार्गदर्शन आणि सहकार्य कायम आमच्या पाठीशी असू द्यावे, असे उपस्थितांना नम्र आवाहन करण्यात आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleबाजरी प्रकल्पाअंतर्गत विस्तार कार्यक्रम, शास्त्रज्ञ भेट, शिवार फेरी व क्षेत्र दिन प्रशिक्षण संपन्न…
Next articleआई-वडिलांचे उपकार कधीही विसरू नका, आपले जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही – ह.भ.प. गणेश महाराज भगत नातेपुतेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here