राम प्रजेच्या प्रश्नासाठी तहसीलदार यांच्या दरबारात प्रजेसह हजर…

कुणाची (मा**) मका आणि कोल्ह्याची भांडणे’ तसे कण्हेरकरांचा दुसऱ्या गावच्या रेशन मालासाठी रंगला राजकीय कलगीतुरा.

माळशिरस ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते हे निटवेवाडी आणि फरतडी ग्रामस्थांचा रेशन दुकानदाराच्या तक्रारीचा प्रश्न घेऊन तहसील कार्यालय माळशिरस येथे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्याकडे जनसमुदायासह गेलेले होते. राम प्रजेच्या प्रश्नासाठी तहसीलदार यांच्या दरबारात हजर झालेले असल्याने सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांच्याविषयी आपलेपणा व प्रेमभावना निर्माण झालेली आहे. मात्र, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांनी राम सातपुते यांच्यावर राजकीय टीका करून एकेरी शब्दात उल्लेख केला. याचा निषेध करण्याकरता भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी बाबासाहेब माने यांच्या वक्तव्यावर संस्कृती सोडून बोलणे योग्य नव्हे असे म्हणून राजकीय टीकाटिपणी केली. विशेष म्हणजे बाबासाहेब माने आणि बाळासाहेब सरगर दोघेही कण्हेर गावचे आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात म्हण प्रचलित आहे ‘कुणाची (मा**) मका आणि कोल्ह्याची भांडणे’ तसे कण्हेरकरांचा दुसऱ्या गावच्या रेशन मालासाठी राजकीय कलगीतुरा रंगला असल्याचे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे.

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी नेहमी आक्रमक भूमिका घेत असतात. जेणेकरून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळून दिलासा मिळावा. शेतकऱ्यांच्या युरियाचा प्रश्न, शेती पंपाच्या विजेचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न असे अनेक सार्वजनिक प्रश्न सोडवून व्यक्तिगत लोकांच्या अडचणीही दूर करीत असतात. त्यामुळे राम सातपुते यांच्याभोवती नेहमी सर्वसामान्य जनतेचा वावर असतो. तालुक्यातील जनतेला हक्काचे व्यासपीठ व सहज उपलब्ध होणारे लोकप्रतिनिधी लाभलेले आहेत. आमदारांची भेट झाल्यानंतर काम होतं याची खात्री जनतेला झालेली आहे.

निटवेवाडी, फरतडी येथील दुकानदाराबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. रेशन दुकानदार रेशनचा माल देत नसल्याचा आरोप अनेक लोकांनी केलेला होता. बायकापोरासकट गोरगरीब व गरजू लोकांनी आमदारासमोर टाहो पडलेला होता. गरिबीची जाणीव असलेल्या आमदारांनी क्षणाचाही विचार न करता पीडित जनतेच्या समवेत तहसीलदार यांच्या दालनात जाऊन व्यथा मांडली. रेशन दुकानदारांवर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यामुळे उपस्थित असलेल्या जनतेमधून समाधान व्यक्त केले जात होते.
निटवेवाडी फरतडी नव्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती गण व गट बदलीमध्ये कण्हेर गटात येत असल्याने राष्ट्रवादीचे बाबासाहेब माने यांनी बोलण्याच्या ओघात एकेरी शब्दाचा उल्लेख करून आमदार यांचा हेतू वेगळा असल्याचे सांगितले. यावर भाजपचे बाळासाहेब सरगर यांनी संस्कृती सोडून लोकप्रतिनिधींनी बोलणे योग्य नव्हे, असे बोलून राजकीय टीकाटिपणी केलेली आहे. त्यामुळे ‘कुणाची (मा**) मका आणि कोल्ह्याची भांडणे’ तसे निटवेवाडी गावच्या रेशन मालासाठी दोन राजकीय नेत्यांचा कलगीतुरा रंगलेला असल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत माने व सरगर आमने सामने येण्याची पहिली पायरी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुक्याच्या वतीने खा. संभाजीराजे भोसले यांना पाठिंबा
Next articleमाळशिरस येथे स्टार आय.सी.यु. अँड मल्टीस्पेशालिटी या भव्य हॉस्पिटलचा शुभारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here