राम यांच्या दमदार कार्याचा आनंद वाटला, मांडवे गावातील हनुमान भक्त सन्मानासाठी लोटला

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची दमदार कामगिरी, मांडवे गावातील श्री क्षेत्र हनुमान मंदिरास दोन कोटी रुपयाचा निधी केला मंजूर

मांडवे ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण विकास मंत्री गिरीशजी महाजन यांच्या सहकार्याने माळशिरस तालुक्यातील मांडवे गावातील श्री क्षेत्र मारुती मंदिर (हनुमान) देवस्थान मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला दोन कोटीची मंजुरी मिळालेली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या दमदार कामगिरीचा मांडवे ग्रामस्थांना आनंद वाटला, त्यामुळे आमदार राम यांच्या सन्मानाला मांडवे गावातील हनुमान भक्त लोटला होता.

मांडवे ग्रामपंचायतचे माजी सरपंच व माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य तानाजीराव पालवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या वतीने लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या निवासस्थानी सन्मान करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बबनराव गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच तानाजीराव पालवे पाटील, माजी सरपंच कुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरजभैय्या साळुंखे पाटील, माजी सरपंच राहुल दुधाळ, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन दुधाळ, मांडवे विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालक दीपक माने पाटील, शिवामृत दूध संघाचे संचालक शरदराव साळुंखे पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊ गायकवाड, प्रगतशील बागायतदार कुंडलिक चव्हाण, आप्पासो बंदुके, संजय काळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा देऊन मांडवे गावचे ग्रामदैवत हनुमान मंदिर व एकशिव गावचे ग्रामदैवत महादेव मंदिर परिसर विकसित करण्याकरता प्रत्येकी दोन-दोन कोट रुपये मंजूर केले आहेत. समितीमध्ये मंत्री राज्यमंत्री आयएसआय अधिकारी अशा 14 लोकांच्या कमिटीने मंजूर केलेले असल्याचे पत्र ग्रामविकास विभागाचे उपसचिव का.गो. वळवी यांनी दिलेले आहे.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे सरकार स्थापन झालेपासून भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात विकासकामांचा धूमधडाका सुरू केलेला आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विकास वाटेवरून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची वाटचाल सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार असताना पुरंदावडे गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीसाठी दोन कोटी रुपये मंजूर केलेले होते. ‘क’ वर्गातून ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा देऊन मांडवे एकशिव व पुरंदावडे गावातील भाविकांमधून लोकप्रिय आमदार यांच्याविषयी समाधानाची व आत्मितीची भावना निर्माण झालेली आहे.

माळशिरस तालुक्यातील अजून अनेक गावातील मंदिरांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्याचे प्रस्ताव दाखल केलेले आहे. ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याने मंदिर परिसर विकसित करण्याकरता व भाविकांच्या सुख सोयी करण्याकरता पुरेसा निधी उपलब्ध होतो. मांडवे गाव श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर आहे. पालखी सोहळ्याच्या वेळी मांडवे गावात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी न्याहारीसाठी थांबत असते. माळशिरस तालुक्यात क्षेत्रफळामध्ये मांडवे गाव सर्वात मोठे आहे. या गावाला भौगोलिक परिस्थिती चांगली आहे. गावामधून ओढा वाहत आहे. गायरान क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे गावामध्ये शासकीय योजना राबविण्याकरता जागेची अडचण येत नाही. भविष्यात मांडवे गाव पर्यटन क्षेत्र व देहू आळंदी पंढरपूर श्रीक्षेत्र शिंगणापूर या देवस्थानातील भाविकभक्तांचे माहेरघर बनू शकते, अशी संकल्पना भविष्यात असू शकते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article2020 Authentic osslt 2019 practice Reasonable Study Iqs
Next articleश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर व मोळी पूजन कार्यक्रमास सदाशिवनगर प्रथम नागरिक उपस्थित राहणार का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here