आमदार राम सातपुते यांचा धैर्यशील मोहिते-पाटील यांच्पस्थितीत खुडूस करांच्या वचनपूर्तीचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार.
खुडूस ( बारामती झटका )
खुडूस तालुका माळशिरस येथील गोदबा पाटील कुस्ती केंद्रांमध्ये सीएम चषक च्या वेळी राम सातपुते यांनी आपल्या भाषणामध्ये कुस्ती केंद्राला सर्वतोपरी भविष्यात मदत करू असे आमदार नसताना वचन दिलेले होते आमदार झाल्यानंतर पूर्ण केल्याने रामायणातील एक वचनी रामाचा प्रत्यय आलेला आहे आमदार राम सातपुते यांच्या आमदार फंडातून हायमास्ट दिवा व मॅटचे उद्घाटन आमदार राम सातपुते, भाजपचे माढा लोकसभा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत खुडूस करांच्या वचनपूर्तीचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक 11 ऑक्टोबर 20 21 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या कार्य कालामध्ये सी एम चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते माळशिरस तालुक्याची जबाबदारी राम सातपुते यांच्याकडे दिलेली होती. सीएम चषक कुस्ती स्पर्धा खुडूस येथील गोदबा पाटील कुस्ती केंद्रांमध्ये मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांतजी भारतीय व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय मालक देशमुख यांच्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेली होती. सदर कार्यक्रमात महाराष्ट्र केसरी बालारफी शेख यांचा सन्मान करून 51 हजाराचे रोख पारितोषिक देण्यात आलेले होते कार्यक्रमाचे संयोजक आमदार राम सातपुते यांनी भाषणांमध्ये भविष्यात गोदबा पाटील कुस्ती केंद्राला भरीव अशी मदत करू असे त्या वेळेस वचन दिले होते.

माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील , प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विशेष कार्य अधिकारी श्रीकांतजी भारतीय यांच्या आशीर्वादाने निवडणुकीच्या वेळी राम सातपुते यांना विजयी करून माळशिरस तालुक्याचे आमदार बनवलेले आहे . त्यामुळे स्वतःचा आमदार फंड आमदार राम सातपुते यांनी गोदबा पाटील कुस्ती केंद्रास आवश्यक असणारे मॅट व हायमास्ट दिवा दिलेला आहे.

गोदबा पाटील कुस्ती केंद्राची निर्मिती 2000 साली वस्ताद देविदास ठवरे यांनी केलेली होती. 2013 साली देविदास ठवरे यांचे अकाली दुःखद निधन झालेले होते त्यांच्या पश्चात एनआयएस कुस्ती कोच वस्ताद महादेव ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वस्ताद बापूराव ठवरे या दोन बंधूंनी गोदबा पाटील कुस्ती केंद्राचे रोपट्याचे वटवृक्षा मध्ये रूपांतर केलेले आहे. कुस्ती केंद्रांमध्ये 200 मल्ल सराव करीत आहे अनेक मल्लांनी महाराष्ट्र चॅम्पियन, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन ,त्रिमूर्ती केसरी, उपमहाराष्ट्र केसरी या पर्यंत मजल मारलेली आहे सुसज्ज असा मातीचा हाऊद आहे 60 बाय 100 मोठा श्री श्री हॉल आहे एकाच ठिकाणी भक्ती आणि शक्ती असे ज्ञानक्षेत्र सुरू आहे. सुसज्ज पटांगणामध्ये हाय मास्ट दिवा आणि भव्य हॉल मध्ये मॅट यामुळे अनेक मल्लांचे भवितव्य घडणार आहे. ग्रामीण भागातील मल्ल मॅट ची अडचण असल्याने पाठीमागे राहात असतात त्यांची अडचण वचनपूर्ती सोहळ्याने दूर होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng