सौ. संस्कृती सातपुते यांचा वागण्यातील साधेपणा व सुसंस्कृत स्वभावाने येळे परिवार गेले भारावून
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राम सातपुते यांनी विविध सार्वजनिक विकास कामे व व्यक्तिगत अनेक लोकांची अडचणीतील कामे करून मने जिंकलेली असताना कण्हेर येथील चिरंजीव रुद्र कुंडलिक येळे या लहान मुलाच्या हृदयाचे ऑपरेशन करून रूद्रचे हृदय जिंकलेले होते. योगायोगाने येळे परिवार यांच्या घरातील सोमवार दि. 13/06/2022 रोजी लग्नसमारंभावेळी सौ. संस्कृती राम सातपुते यांचा वागण्यातील साधेपणा व सुसंस्कृत स्वभावामुळे येळे परिवार भारावून गेलेले होते. राम यांनी रुद्रचे जिंकलेले हृदय संस्कृती यांनी रुद्रला उचलून घेऊन मायेने हृदयापासून हसवून रुद्रचे हृदय आनंदाने फुलवले असल्याचे उपस्थित येळे परिवारासह नातेवाईक यांना पहावयास मिळाले आहे.

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांची जिल्हा नियोजन समिती आढावा बैठक सोलापूर येथे आयोजित केलेली होती. सदर बैठक महत्त्वाची असल्याने सोलापूरला जाणे गरजेचे होते. मात्र तालुक्यात चार ते पाच ठिकाणी लग्न समारंभ होते.

कायम जनतेच्या सुख-दुःखात सहभागी असणारे आ. राम सातपुते यांनी आपली उणीव लग्न समारंभातील आयोजकांना भासू नये यासाठी धर्मपत्नी सौ. संस्कृतीताई सातपुते यांना शुभविवाहास भेटी देण्याचे सांगितलेले होते. त्याप्रमाणे संस्कृतीताई यांनी आज होणाऱ्या सर्व विवाहास भेटी देत असताना कण्हेर येथील येळे परिवारांच्या लग्न समारंभ प्रसंगी हृदयाचे ऑपरेशन केलेल्या रुद्रला सौ. सोनाली कुंडलिक येळे यांच्या कडेवरून घेऊन संस्कृती ताईंनी मायेने पापा घेतला. रुद्रला खेळवून हृदयापासून हसवून रुद्रचे ह्रदय फुलवले आहे. यावेळी रुद्रचे आजोबा गणपत येळे व आजी सौ. सुमन येळे यांच्यासह उपस्थित असणारे सौ. संस्कृतीताई सातपुते यांचा वागण्यातील साधेपणा व सुसंस्कृत मनमिळावू स्वभावामुळे भारावून गेलेले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng