दिल्ली (बारामती झटका)
राष्ट्रपती भवनाकडून रविवारी १२ फेब्रुवारी सकाळी प्रेसनोटद्वारे अत्यंत महत्वाची माहिती देण्यात आली. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी देशातील एकूण १२ राज्यांचे राज्यपाल आणि १ केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल बदलले आहेत.
यात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्विकारुन त्यांना पदमुक्त करण्यात आले. त्यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
राज्य आणि नवीन राज्यपाल
1. महाराष्ट्र – रमेश बैस
2. बिहार – राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
3. आंध्र प्रदेश – निवृत्त न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर
4. छत्तीसगड – बिस्व भूषण हरिचंदन
5. झारखंड – सीपी राधाकृष्णन
6. हिमाचल प्रदेश – शिवप्रताप शुक्ला
7. अरुणाचल प्रदेश – लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक
8. सिक्कीम – लक्ष्मण प्रसाद आचार्य
9. आसाम – गुलाबचंद काटरिया
10. नागालँड – ला गणेशन
11. मेघालय – फागु चौहान
12. मणीपूर – अनुसुईया उकिये
13. लडाख (केंद्रशासित प्रदेश) – बीडी मिश्रा (नायब राज्यपाल)
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng