नवी दिल्ली ( बारामती झटका )
ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री श्री. यशवंत सिन्हा प्रणेते असलेल्या ‘राष्ट्रमंचा’ची अनौपचारिक बैठक श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पार पडली. जेष्ठ गीतकार श्री. जावेद अख्तर साहेब, ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे नेते ओमर अब्दुल्ला जी, ‘राष्ट्रीय लोकदला’चे अध्यक्ष जयंत चौधरीजी, अॅड. माजीद मेमन जी, पवन वर्माजी, के.सी.सिंग जी, ए. पी. शहा जी यांच्यासह इतर दिग्गज राजकिय नेते, अर्थशास्त्रज्ञ, विधिज्ञ यांनी देशातील सद्यस्थितीबाबत यावेळी चर्चा केली. या बैठकीमध्ये सहभागी होण्याची संधी खासदार वंदना चव्हाण यांना मिळाली. यामध्ये प्रामुख्याने ढासळती अर्थव्यवस्था, सामाजिक वातावरण, घटनात्मक हक्कांची पायमल्ली, कोविड महामारीचे संकट आणि त्याचे निराकरण, भाववाढ, बेरोजगारी आदी ज्वलंत विषयांवर चर्चा झाली.
आज देशातील युवक हा अस्वस्थ आहे. उद्योगधंदे बंद पडत असल्याने बेकारी वाढत आहे. ज्या युवकांच्या खांद्यावर देशाचे उद्याचे भवितव्य अवलंबून आहे त्या युवकांच्या भविष्याची जबाबदारी पेलण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या अनुषंगाने आपल्या लोकांच्या गरजा व स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत या बैठकीत साधकबाधक चर्चा झाली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng