राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल रेडे पाटील यांना प्रभाग क्र. २ मधून वाढता पाठिंबा, विजयाकडे घोडदौड

महाळुंग – श्रीपुर नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक वाढणार.

महाळुंग ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील माढा विधानसभा मतदार संघातील महाळुंग श्रीपुर नगरपंचायतची २०२१-२२ पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. १७ जागांपैकी ओबीसीच्या ४ जागा वगळता १३ जागाच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल प्रमुख राहुल कुंडलिक रेडे पाटील यांना प्रभाग क्र. २ मधून अटीतटीच्या लढतीत वाढता पाठिंबा मिळत असून विजयाकडे घोडदौड सुरू आहे. महाळुंग श्रीपुर नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक वाढणार असल्याची चर्चा महाळुंग पंचक्रोशीत रंगलेली आहे.

महाळुंग गावचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय कुंडलिकराव रेडे पाटील उर्फ कुंडलिक भाऊ यांचा वसा आणि वारसा त्यांचे चिरंजीव राहुल यांनी जपलेला आहे. भाऊंच्या पश्चात त्यांच्या पार्टीचे नेतृत्व राहुल यांच्याकडे आले आहे. भाऊंनी सोलापूर जिल्हा परिषद सदस्य, महाळुंग गावचे सरपंच, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य अशा अनेक पदावर काम केलेले आहे. प्रतिकूल परिस्थितीत गावाच्या विकासामध्ये भाऊंचे मोलाचे सहकार्य आहे. महाळुंग गावच्या आजपर्यंतच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये भाऊ जिकडे असतील तिकडे विजय निश्चित असतो. त्यामुळे भाऊंचे वारसदार राहुल आप्पा यांच्या पाठीशी मतदार ठामपणे उभा राहिलेले आहेत.

कुंडलिक भाऊ यांनी केलेले कार्य सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवणे, गावाचा विकास अशा अनेक ऋणातून मुक्त होण्यासाठी मतदारांनी राहुल आप्पांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राहुल आप्पांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता महाळूंग – श्रीपुर नगरपंचायतमध्ये येऊ शकते, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामदैवत यमाई देवी येथे श्रीफळ वाढवून करण्यात आलेला होता. नियोजनबद्ध प्रचार होम टू होम कार्यकर्त्यांनी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी आजपर्यंत केलेल्या भाऊंच्या कार्याची आठवण आणि भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गावातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले जात आहे. मतदारांना विश्वास असल्याने मतदारसुद्धा उमेदवारांना विश्वास देऊन विजयाची खात्री देत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराष्ट्रवादीचे उमेदवार सचिन टेळे तेंडुलकर सारखा विजयाचा षटकार मारणार – नानासाहेब काळे
Next articleवनगळीत दत्तजंयती भक्तीभावाने साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here