राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन टेळे तेंडुलकर सारखा विजयाचा षटकार मारणार – नानासाहेब काळे

माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सचिन महादेव टेळे प्रभाग क्र. ७ मधून निवडणूक रिंगणात उभे

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ पंचवार्षिक नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्र. ७ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सचिन महादेव टेळे निवडणूक रिंगणात उभे आहेत. प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक सात पिंजून काढून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, आजपर्यंत उमेदवारांनी केलेले कार्य व भविष्यात नियोजित केलेली कामे याची सर्व माहिती होम टू होम जावून मतदारांपर्यंत पोचवली असल्याचे कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीमध्ये सांगून युवा नेते नानासाहेब काळे यांनी सर्व मतदार संघात नियोजन प्रचार व मतदारांचा विश्वास त्यामुळे आपले राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन महादेव टेळे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सारखा विजयाचा षटकार मारणार असल्याचे सांगितले.

सचिन महादेव टेळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत मतदारसंघांमध्ये कोरोना महामारीच्या वेळी सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केलेले होते. लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक लोकांना अडचणीत मदत करून अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू व पालेभाज्या यांचे वाटप करून दिलासा दिलेला होता. मतदारसंघांमध्ये अनेक लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होऊन लोकांना अडचणीच्या काळात मदत केलेली होती. उत्कृष्ट समाजसेवक म्हणून त्यांनी प्रभागातील सर्व जाती धर्मातील लोकांना आपलेपणाची वागणूक दिलेली होती. अनेक लोकांनी अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत, अशी भावना सर्वच कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

माळशिरस नगर पंचायत पॅनल प्रमुख माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व तुकारामभाऊ देशमुख यांनी केलेले कार्य, जनतेच्या सोडविलेल्या अडीअडचणी याची जाणीव जनतेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तुकाभाऊ यांच्याविषयी आत्मीयता निर्माण झालेली आहे. प्रभागामध्ये ४५६ पुरूष मतदार व ४१६ स्त्री मतदार आहेत. त्यामुळे सचिन टेळे यांना मतदारसंघात उदंड प्रतिसाद मिळत आहे, असे युवा नेते नानासाहेब काळे यांनी कार्यकर्त्यांना सांगुन विजयाच्या षटकाराची खात्री दिली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्रतिकुल परिस्थितीवर मात करत शून्यातून विश्व निर्माण केलेले मांडकी गावचे सुपुत्र युवा उद्योजक शत्रुघुनशेठ रणनवरे – दादासाहेब हुलगे
Next articleराष्ट्रवादीचे उमेदवार राहुल रेडे पाटील यांना प्रभाग क्र. २ मधून वाढता पाठिंबा, विजयाकडे घोडदौड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here