राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा – युवानेते अमोल पनासे

उत्तमराव जानकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्वरोगनीदान शिबीर, इंदुरीकर महाराज किर्तन व विविध कार्यक्रमाचे आयोजन

वेळापूर ( बारामती झटका)

चांदापुरी कारखान्याचे चेअरमन, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रम करून साजरा करण्यात येणार असल्याचे युवा नेते अमोल पनासे यांनी बारामती झटक्याशी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना युवा नेते अमोल पनासे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त रेशनकार्ड शिबिर, पाच हजार फळाच्या झाडांचे वाटप, कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदूरकर देशमुख यांचे कीर्तन व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यामध्ये दि. १५ जुलै २०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय वेळापूर येथे शिबीर सकाळी ११ ते ५.०० वेळेत रेशन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नवीन रेशन कार्ड, दुरुस्ती करणे, नाव वाढविणे, नाव कमी करणे, विभक्त करणे याबाबत कामे करण्यात येणार असून जवळजवळ हजार लोकांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेतला.

तर दि. १७ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वा. समाज प्रबोधनकार सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदूरकर देशमुख यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पालखी मैदान वेळापूर येथे होणार असून या वाढदिवसाचे औचित्य साधून पाच हजार झाडांचे वाटप करण्यात येणार आहे.

दि. १७ जुलै रोजी संयोजक अमोल पनासे मित्रमंडळ यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत इंग्लिश स्कूल वेळापूर येथे करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात हृदयविकार, मेंदू विकार, मोतीबिंदू, बायपास, शस्त्रक्रिया, मशीनद्वारे स्तनांच्या कॅन्सरची तपासणी यांसह किडनी विकार, हर्निया, मुळव्याध, पित्ताशयातील खडे, पोटाच्या व इतर शस्त्रक्रिया यांसह तपासणी केली जाणार आहे‌. 

तरी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत व अमोल पनासे मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसदाशिवनगर येथील रत्नत्रय शैक्षणिक संकुलात भव्य रक्तदान शिबिर
Next articleलोकनेते उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here