राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांनी रक्तदान करून ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ असणाऱ्यांना दिली चपराक

पुरंदावडे ( बारामती झटका )

चांदापुरी कारखान्याचे चेअरमन सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांनी पुरंदवडे येथील भवानी माता मंदिरामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते.

सदर रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद मिळालेला असून १२३ रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे. विशेष म्हणजे रक्तदान शिबिराचे आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने यांनी स्वतः रक्तदान करून ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण’ असे असणाऱ्यांना चपराक दिली आहे. कितीतरी वेळा असे असते रक्तदान शिबिर आयोजित करतात मात्र स्वतः रक्तदान करत नाहीत.

राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर स्वतः रक्तदान शिबिरास उपस्थित होते. भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन रक्तदान शिबिरास सुरुवात झाली‌.

सदर रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमास माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंत पालवे, मधुकर पाटील, गौतम आबा माने, बबनराव पालवे, अजय सकट, माजी जिल्हा परिषद सदस्य त्रिभुवन उर्फ बाळासाहेब धाईंजे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विकासदादा धाईंजे, शिवप्रसाद दूध डेअरीचे युवा उद्योजक शरद बापू मोरे, माळशिरस नगरपंचयतीचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. मारूतीराव पाटील, माजी नगरसेवक मारुती उर्फ आप्पासो देशमुख, जेष्ठ नेते भगवानराव पिसे, बाजीराव माने, आरीफभय पठाण, दादासाहेब वाघमोडे, शामराव बंडगर, सोमनाथ पिसे, विकास देशमुख, फोंडशिरसचे सरपंच पोपटराव बोराटे, मांडवेचे सरपंच हनुमंत टेळे, माजी सरपंच रामभाऊ गोरड, गोरडवाडीचे युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड, खंडू तात्या कळसुले (पवार), पांडुरंग पिसे, दादासाहेब पालवे, मदन सुळे, तानाजी पालवे, महादेव वाघमोडे, सागर फरतडे, जालींदर ओव्हाळ, सोपानकाका जाधव, नारायण जानकर, विठ्ठल पालवे, अमोल शिंदे, नवा काळे, सुनील गोरे, विशाल जठार, अंकुश काळे, राहुल पालवे, बाळासाहेब शेलार, राजकुमार गरगडे, सतिश पालवे, दत्तात्रय भोसले, कुमार भैस, अर्जुन सुळ, रमेश ननावरे, सुरेश गोरे, कालिदास रूपनवर आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बिनविरोध निवड
Next articleसर्पमित्र प्रकाशभैय्या गायकवाड यांची सापाविषयी माहिती, सर्प दंश झाल्यास काय करावे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here