राष्ट्रवादीचे पॅनल प्रमुख तुकाराम देशमुख यांना वार्ड क्रमांक चार मधील मतदारांचा वाढता पाठींबा.

नियोजनबद्ध होम टू होम प्रचाराने मतदारांचा थेट संपर्क साधल्याने सर्वसामान्य जनतेच्या मनातील कार्यकर्त्यांचे हितगूज

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॅनल प्रमुख तुकाराम देशमुख यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध होम टू होम प्रचाराने मतदारांचा थेट संपर्क साधला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनाशी कार्यकर्त्यांनी हितगूज साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार तुकाराम देशमुख यांना वार्ड क्रमांक 4 मधील मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेली आहे.

माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व म्हणून तुकाराम देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. लहानांपासून थोरांपर्यंत त्यांना तुकाभाऊ या नावाने ओळखतात. तुकाभाऊ यांनी चुलते स्वर्गीय बापूनाना देशमुख यांची प्रेरणा व मार्गदर्शन घेऊन वडील स्वर्गीय रामचंद्र यांच्या आशीर्वादाने आजपर्यंत राजकीय आणि सामाजिक वाटचाल केलेली आहे. माळशिरस पंचायत समितीचे सदस्य व माळशिरस शहराचे सरपंच अशा दोन पदावर त्यांनी प्रामाणिक व निस्वार्थीपणे काम केलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तुकाभाऊ यांची वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. तुकाभाऊ यांच्यापेक्षा वयाने मोठे असणारे लोकसुद्धा तुकाभाऊ यांना मानसन्मान देत असतात. तुकाभाऊ यांनी सुद्धा समाजामध्ये वावरत असताना स्वर्गीय बापूनाना देशमुख यांची विचारधारा जपलेली आहे. अनेक लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होऊन अनेक लोकांना अडचणीच्या काळात मदतीचा हात दिलेला आहे. अनेक लोकांचे कौटुंबिक कलह मिटवलेले आहेत. कधीही कुणाच्या संसारामध्ये मीठ टाकलेले नाही, नेहमी साखर टाकून अनेकांचे संसार सुखी केलेले आहेत. कमी वयामध्ये भाऊंच्या विचारधारेमुळे पोक्त माणसाचा सन्मान दिला जातो, भाऊसुद्धा न्यायनिवाडा करीत असताना आपला जवळचा लांबचा असा मनामध्ये हेतू न ठेवता चूक असेल त्याची चूकच सांगत असल्याने भाऊंनी कोणावरही अन्याय केलेला नाही.

राजकारण व समाजकारण करीत असताना शांत, स्पष्ट व सुसंस्कृत स्वभाव त्यांनी कधीही ढळू दिला नाही. त्यामुळे जनसामान्य माणसात भाऊंची प्रतिष्ठा वेगळी आहे. आचार विचार शुद्ध असल्याने अनेक जातिधर्मातील कुटुंबांमध्ये भाऊंना मानाचे स्थान आहे. माळशिरस शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाऊंनी पंचायत समिती सदस्य व सरपंच पदाचा उपयोग करून अनेक प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे माळशिरसकरांना भाऊंच्या कार्याचा अनुभव आहे. नगरपंचायत निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक चारमध्ये ते उभे आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. कार्यकर्ते होम टू होम जाऊन प्रचार करीत आहे. मतदारांमधून भाऊंच्या विषयी आदराची भावना बोलून दाखविली जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना उत्साह वाढलेला आहे. मतदान होऊन मतमोजणी होण्याच्या अगोदरच मतदारांनी भाऊंना दिलेला कौल सर्व काही सांगून जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसंग्रामसिंह मोहिते-पाटील यांची अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयाला सदिच्छा भेट
Next articleमहाराष्ट्रातील काका पुतण्या यांच्या राजकीय लढाईचे माळशिरस तालुक्यात मेडद ग्रामपंचायतमध्ये पडसाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here