राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांची परिसंवाद यात्रा माळशिरस तालुका दौरा जाहीर.

माळशिरस तालुका राष्ट्रवादीतील परिसंवाद दौऱ्याचे खुर्द व बुद्रुक नेत्यांची दौरा नियोजनात नावे.

परिसंवादात कान उघडणी होणार का ? एरंडाचे गुर्‍हाळ रस ना चोथा नेहमीप्रमाणे राजकीय विश्लेषकांचे लागले लक्ष.


माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महा विकास आघाडी सरकारमधील जलसंपदामंत्री यांचा राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा बुधवार दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी काळी सोलापूर येथून बार्शी, वैराग, करमाळा, टेंभुर्णी, माळशिरस येथे दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी आगमन ते सहा वाजेपर्यंत माळशिरस विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक येथून इंदापूर मुक्काम असा प्रदेशाध्यक्ष यांचा दौरा सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी जाहीर केलेला आहे माळशिरस दौऱ्यात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरराव देशमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य उत्तमराव जानकर यांची नावे आहेत त्यामुळे माळशिरस तालुका राष्ट्रवादी तील परिसंवाद दौऱ्याचे खुर्द व बुद्रुक नेत्यांची दौरा नियोजनात नावे असल्याने राजकीय वर्तुळामध्ये कसे नियोजन असणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रातील संवाद यात्रेची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून झालेली आहे.
परिसंवाद यात्रेत सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री तथा राज्यमंत्री दत्तामामा भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष कथा महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर,राष्ट्रवादीचे प्रवक्ते व प्रदेश सरचिटणीस रविकांत वरपे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, विधान परिषदेचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, सोलापूर जिल्हा पक्ष निरीक्षक सूरेशजी घुले, जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, युवती जिल्हाध्यक्ष संध्याताई भोसले, आदी पदाधिकारी समवेत आहेत.
माळशिरस तालुक्यात अंतर्गत गटबाजी व श्रेयवाद यामुळे नगरपंचायत निवडणुकीत घड्याळाची टिकटिक कमी झालेली होती. माळशिरस नगरपंचायत मध्ये कमळाच्या मदतीने घड्याळाची टिकटिक वाढलेली आहे. मात्र नातेपुते नगरपंचायत मध्ये काय चाललय पायाला राष्ट्रवादीचा नगरसेवक नाही हे राष्ट्रवादीचे दुर्दैव आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत गट व गण रचना तयार होऊन अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. माळशिरस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन वेगवेगळे गट आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळी असणारा राष्ट्रवादीसोबत चा गट आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी असणारा राष्ट्रवादीसोबत चा गट असे खुर्द व बुद्रुक दोन गट राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आहेत माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टीमध्ये खुर्द व बुद्रुक गट आहेत सध्या भाजपच्या गटामध्ये मनो मिलन सुरू आहे. राष्ट्रवादीचे मनोमिलन प्रदेशाध्यक्ष करतील का ? राष्ट्रवादीच्या नाराज नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे ऐकून घेतील का ? कार्यकर्त्यांना तालुक्यातील नेते वरिष्ठांना सुसंवाद साधून देतील का ? का नेहमीप्रमाणे एरंडाचे गुऱ्हाळ होणार याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअहो, भाऊसाहेब.. काल काय वाचलंय, ऐकलंय ते खरं हाय का ?
Next articleस्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार. अजित(भैय्या)बोरकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here