प्रमुख उपस्थिती दत्तामामा भरणे, रूपालीताई चाकणकर, महबूब शेख, रविकांत वरपे, सक्षणाताई सलगर, सुनील गव्हाणे, बळीरामकाका साठे, दीपकआबा साळुंखे पाटील, उमेश पाटील, सुरेश घुले सुप्रियाताई गुंड यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती.
फत्तेसिंह माने पाटील, धैर्यशीलभाऊ देशमुख, डॉ. रामदास देशमुख, पांडुरंगभाऊ देशमुख, माणिकबापू वाघमोडे, निजामभाई काझी, शंकरनाना देशमुख, संकल्पभैया डोळस, राहुल रेडे पाटील, राजाभाऊ हिवरकर, अशोकराव गायकवाड, मौलाभाई पठाण यांच्यासह अनेक नेते कार्यकर्ते व राष्ट्रवादी प्रेमी उपस्थित राहणार.
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महा विकास आघाडी सरकारमधील जलसंपदामंत्री यांचा राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा बुधवार दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी काळी सोलापूर येथून बार्शी वैराग करमाळा टेंभुर्णी माळशिरस येथे दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी माळशिरस येथील हॉटेल मेरिडियन मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी माळशिरस विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक आयोजित केलेली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रातील संवाद यात्रेची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून झालेली आहे. परिसंवाद यात्रेत सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री तथा राज्यमंत्री दत्तामामा भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष कथा महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर,राष्ट्रवादीचे प्रवक्ते व प्रदेश सरचिटणीस रविकांत वरपे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, विधान परिषदेचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, सोलापूर जिल्हा पक्ष निरीक्षक सूरेशजी घुले, जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, युवती जिल्हाध्यक्ष संध्याताई भोसले, आदी पदाधिकारी समवेत आहेत.
माळशिरस तालुक्यातील सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशीलभाऊ देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकबापू वाघमोडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर रामदास देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंगभाऊ देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संकल्पभैया डोळस,ज्येष्ठ नेते निजामभाई काझी, राजाभाऊ हिवरकर, मौलाभाई पठाण, नूतन नगरसेवक राहुल रेडे पाटील, अशोकराव गायकवाड, प्रभाकर इंगळे सर देशमुख, लक्ष्मणराव मगर, मदनसिंह माने देशमुख, यांच्यासह माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी सदरच्या संवाद यात्रेस राष्ट्रवादी प्रेमींनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख यांनी आवाहन केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng