राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे व प्रदेश सचिव श्रीराम सातपुते यांची बारामती झटका कार्यालयास सदिच्छा भेट.

राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वावर उच्चपदस्थ मिळालेल्या संधीचे सोने करून वरिष्ठांचा विश्वास संपादन करतील .


अकलूज ( बारामती झटका )

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते रविकांतजी वरपे व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सचिव व महाराष्ट्र राज्य रोजगार व स्वयंरोजगार उपप्रमुख पदी नियुक्ती केलेले श्रीराम सातपुते यांनी बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे अकलूज येथील कार्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी माळशिरस पंचायत समितीचे सदस्य अजय सकट, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहित गायकवाड, उपस्थित होते.


राज्य प्रवक्ते रविकांत वरपे व प्रदेश सचिव श्रीराम सातपुते यांचा सोलापूर जिल्हा दौरा असताना आवर्जून अकलूज तालुका माळशिरस येथील बारामती झटका कार्यालयास सदिच्छा भेट दिली .त्यावेळी त्यांचा सन्मान संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
रविकांत वरपे व श्रीराम सातपुते यांची मुलाखत संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी घेतली. त्यावेळेस त्यांनी बोलताना देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब,महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, युवा आमदार रोहितदादा पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख यांनी टाकलेला विश्वास आहे.

सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहचविण्याचे काम भविष्यामध्ये करणार आहे. महाराष्ट्र मध्ये युवकांचे अनेक प्रश्न आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील नेत्यांच्या विचाराचा वारसा जपणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार घेऊन काम करीत आहे त्यामुळे सर्व जाती धर्म व सर्व घटकातील लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अपेक्षा आहेत. पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पडणार असल्याची भावना बोलून दाखवली.


रविकांत वरपे व श्रीराम सातपुते यांना राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वावर उच्चपदस्थ मिळालेल्या संधीचे सोने निश्‍चितपणे करून वरिष्ठांचा विश्वास संपादन करतील असा त्यांच्या मुलाखतीवरून विश्वास वाटत आहे त्यांना बारामती झटका परिवार यांचेकडून भावी कार्य खरेदीसाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमेडद ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत नाथाआबा लवटे पाटील व नवनाथ जगताप यांच्यात चुरशीची लढत.
Next articleसंभाजी ब्रिगेड माळशिरस तालुकाध्यक्षपदी शिवश्री दिगंबर मिसाळ यांची निवड .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here