पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी नगरपंचायतची चूक पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत सुधारावी.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस नगरपंचायत चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागलेले आहे, याचे खरे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष माणिकराव वाघमोडे यांना अंधारात ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म एका गटाला दिलेले असल्याने नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य अंधारात गेले आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी एबी फॉर्म एका गटाला देऊन तालुका अध्यक्ष यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे मतविभागणी झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी नगरपंचायतची चूक पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत सुधारावी, अथवा जिल्हा परिषदेमध्ये माळशिरस तालुक्याचा प्रतिनिधी राहणार नाही, असे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या निष्ठावान गोटामध्ये बोलले जाते.
माळशरस नगरपंचायत निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने दहा जागेवर उमेदवार निवडून आणलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागेवर निवडून आलेली आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव वाघमोडे यांनी महाराष्ट्र विकास आघाडी माध्यमातून दोन जागा निवडून आणल्या तर अपक्ष 3 जागेवर निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पॅनल प्रमुख तुकाराम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लढले तर तालुका अध्यक्ष माणिकराव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विकास आघाडी मधून उमेदवार लढले. अनेक प्रभागांमध्ये दोघांचा एकमेकांना फटका बसलेला आहे. मतांची विभागणी झालेली असल्याने सात ते आठ ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत.
वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष यांना विश्वासात घेऊन पक्षाचे ए बी फॉर्म देणे गरजेचे होते मात्र, जिल्ह्याची जबाबदारी असणारे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी एकाच गटाला कोणाच्या सांगण्यावरून ए बी फार्म दिले असा सवाल उपस्थित होत आहे. माणिकराव वाघमोडे आणि तुकाराम देशमुख यांच्यामध्ये विभागून किंवा एकत्र बसवून राष्ट्रवादीच्या एबी चिन्हाचे वाटप झाले असते तर माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत सात ते आठ उमेदवार यांचा पराभव झाला नसता. माळशिरस नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व येऊन दहा ते बारा उमेदवार निवडून आले असते. झालं ते झालं लग्नात बहिणीचं पोरगं भावाची पोरगी लग्नात गोंधळ झाला, आता सुखाने संसार करू, अशी म्हणण्याची वेळ राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्यावर आलेली आहे. पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी नगरपंचायतची चूक पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत सुधारावी अन्यथा जिल्हा परिषदेमध्ये माळशिरस तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रतिनिधी काय चाललंय हे पाहायला सुधारणार नाही असे राष्ट्रवादीच्या गोटातून बोलले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng