राष्ट्रवादीच्या नेत्या रंजनाताई हजारे यांचेकडून अनोखी मदत

महिला दिनानिमित्त महिनाभर देणार गरोदर महिलांसाठी मोफत रिक्षा सेवा

पंढरपूर (बारामती झटका)

महिला दिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम पाहायला मिळाले असतानाच, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष रंजनाताई हजारे यांनी महिला दिनाचे औचित्य साधत महिलांसाठी एक वेगळाच उपक्रम राबविला असून हा स्तुत्य उपक्रम तब्बल एक महिनाभर मोफत सेवा देणारा आहे. यामुळे पंढरपुर शहरातून या उपक्रमाची चांगलीच चर्चा ऐकावयास मिळू लागली आहे.

राष्ट्रवादीच्या जिल्ह्यच्या नेत्या असलेल्या रंजनाताई हजारे यांनी पंढरपूर शहरातील उपनगर भागातील खास गरोदर महिलांसाठी महिनाभर रिक्षा सेवा मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या भागातील महिलांची मोठी समस्या मिटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष जयमालाताई गायकवाड, निरीक्षक दीपालीताई पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील स्तुत्य उपक्रम महिनाभर चालू केला आहे.
हा मोफत रिक्षा सेवा देण्याचा उपक्रम दि. १० मार्चपासून दि. १0 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. तरी गरजूंनी संपर्क साधावा असे आवाहनही रंजनाताई हजारे यांनी केले आहे.
सदरची मोफत रिक्षाची सोय दुपारी १2 वाजले पासून रात्री १2 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. यासाठी हॉटेल नागालँड समोर उजनी कॉलनी येथील ब्लॉक नंबर ४ मधील खोली नंबर ६ येथे संपर्क साधावा, अथवा मोबाईल वरती ८८३०००५०८९ किंवा ९३५६९९५०५२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रंजनाताई हजारे यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजनजागृती सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना पुरस्कार व सन्मानपत्र प्रदान
Next articleशाळा व्यवस्थापन समिती कार्यशाळा कदमवाडी नं. 2 येथे संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here