राष्ट्रवादी काँग्रेसची महाळूंग- श्रीपुर नगरपंचायतीच्या निवडणुकीचे ‘एकच फाईट, वातावरण टाईट’ असं नियोजन.


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री दत्तामामा भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, रूपालीताई ठोंबरे यांच्यासह अनेक मान्यवरांची जाहीर सांगता सभा.

महाळुंग ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघातील महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सांगता सभा सोमवार दि. २०/१२/२०२१ रोजी दु. १ वा. ज्ञानेश्वर मंगल कार्यालय श्रीपुर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीमध्ये एकच फाईट वातावरण टाईट असं नियोजन झाले आहे.
महाळुंग श्रीपुर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच नगरपंचायतची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, आरपीआय व अपक्ष अशा १३ जागांसाठी ४५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. खरी लढत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे. महाळुंग गावचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय कुंडलीकभाऊ रेडे पाटील यांच्या आशीर्वादाने राहुल रेडे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या सहकार्याने नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार उभे केलेले आहेत. प्रचाराची सांगता सभा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा महा विकास आघाडी सरकारमधील जलसंपदामंत्री नामदार जयंतराव पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन होणार आहे. या सभेसाठी खास आवर्जून सामाजिक न्याय मंत्री नामदार धनंजय मुंडे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, डॅशिंग नेत्या रूपालीताई ठोंबरे, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते व कार्याध्यक्ष उमेश पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य उत्तमराव जानकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख, प्रांतिक सदस्य राहुल रेडे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा, तालुका पदाधिकारी, नगर पंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी मतदार बंधू व हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे मौलिक विचार, धनुभाऊ आणि दोन रूपालीताई यांची फटकेबाजी यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाळुंग नगर पंचायत निवडणुकीसाठी ऐतिहासिक सभा ठरणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे एकच फाइट निवडणुकीचे वातावरण टाईट असं नियोजन झाले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरत्नत्रय पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद – आमदार राम सातपुते
Next articleमहापुरुषांचा अवमान करणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमय्या यांना महाराष्ट्रात फिरकू देणार नाही – सचिन जगताप, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here