माळशिरस नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्र. ८ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ. प्रियांका धनाजी टेळे यांचा होम टू होम प्रचार नियोजनबद्ध सुरू.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२१-२२ या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्र. ८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. प्रियांका धनाजी टेळे यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे. महिलांना सोबत घेऊन प्रभागांमध्ये होम टू होम जाऊन घड्याळ चिन्ह मतदारांना समजावून सांगून उज्वल भविष्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठाम रहावे, असे मतदारांना आवाहन करीत आहेत. त्यांच्या होम टू होम प्रचाराने मतदारांमध्ये आपुलकी व प्रेम निर्माण होत आहे.

माळशिरस नगरपंचायत निवडणुकीमध्ये माजी पंचायत समिती सदस्य माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व तुकाराम भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे आहेत. प्रभाग क्र. ८ मध्ये प्रियांका धनाजी टेळे उभ्या राहिलेल्या आहेत. समाजसेवक धनाजी टेळे यांनी गेली अनेक वर्ष प्रभागांमध्ये सर्वसामान्य जनतेची सेवा केलेली आहे. अडचणीतील लोकांना मदत केलेली आहे. कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेला दिलासा दिलेला होता. छोटे-मोठे उद्योग व्यवसाय बंद असल्याने अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आलेली होती, अशा कठीण परिस्थितीत समाजसेवक धनाजी टेळे यांनी पॅनल प्रमुख तुकाराम भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केलेले होते. अनेक लोकांना अडचणीत मदत केलेली होती. समाजामध्ये धनाजी टेळे परिवार यांनी वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. सौ. प्रियांका यांनीही मतदारांच्या व्यक्तिगत भेटीगाठी घेऊन प्रभागांमधील अडीअडचणी जाणून घेतलेल्या आहेत.
महिलांना विश्वासात घेऊन भविष्यामध्ये आपण संधी दिल्यानंतर आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण मला मतदानरुपी आशीर्वाद द्यावा, असे होम टू होम मतदारांपर्यंत पोहचुन मतदारांना आपलेसे करीत आहेत. त्यांना प्रभागातील अनेक महिलांची साथ मिळत आहे. प्रभागांमध्ये प्रचारात उदंड प्रतिसाद मिळत आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ. प्रियांका धनाजी टेळे यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng