राष्ट्रवादी महिला काँग्रेस माळशिरस तालुक्याच्या निवडी

वेळापूर (बारामती झटका)

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माळशिरस तालुका पदाधिकारी निवड आज करण्यात आली.

सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सीमाताई एकतपुरे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली सदर निवडी संपन्न झाल्या. यामध्ये तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून वृषाली ओंकार आडत, तालुका उपाध्यक्ष सुचिता शेंडे, कार्याध्यक्ष शशिकला देवकर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्षा शमशाद बेगम शिकलकर, अल्पसंख्याक उपाध्यक्ष कौसर नदाफ, पिलीव शहराध्यक्ष पूनम भैस, संजयनगर कार्याध्यक्ष जयश्री एकतपुरे, संजयनगर सरचिटणीस भाग्यश्री एकतपुरे, संजयनगर सदस्य सगुणा साठे, अकलूज कार्याध्यक्ष उज्वला अडाणे, नातेपुते नगराध्यक्ष नंदाताई सोरटे आदींच्या निवडी करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर व तालुकाध्यक्षा सीमाताई एकतपुरे यांनी उपस्थित महिलांचे अभिनंदन करून खासदार शरदचंद्र जी पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळात पोहचविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपाध्यक्ष अश्विनी भानवसे उपस्थित होत्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleधर्मपुरी गावच्या सरपंच पदाचा कोणाकडेही पदभार अथवा सहीचा अधिकार दिलेला नाही – ग्रामपंचायत सदस्य सागर झेंडे.
Next articleसंग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here