राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांचा भाजपचे निलेश राणे यांना टोला

मुंबई (बारामती झटका)

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता रविकांत वरपे यांनी भाजपचे निलेश राणे यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले आहेत कि, अहो निलेश राणे तुम्हाला कदाचित माहीत नसावं, आदरणीय अजितदादा पवार हे बुद्धिमान आहेत. म्हणून तर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनेच त्यांना महत्वाच्या GST System Reforms या ग्रूप ऑफ मिनिस्टर कमिटीचे प्रमुख केलं आहे. त्यांच्यावर GST System Effective, Efficient, Business Process, Identify Potential Revenue Leakage या धोरणात्मक कामाची जबाबदारी सोपवली आहे.

सदर निवड नरेंद्र मोदी सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. मग जबाबदारी देणारे बुद्धिमान नाहीत…!, असेच तुम्हाला म्हणायचे आहे का ?

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleडॉ. यशवंतराव कुलकर्णी यांना उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बेस्ट एमडी पुरस्काराने सन्मानित करणार
Next articleखासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार फंडातून धर्मपुरी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here