राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव पदी नातेपुते येथील युवानेते पै. अक्षयभैय्या भांड यांची निवड.

सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील व प्रदेश अध्यक्ष महबूब शेख या उभयतांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी भवन येथे पत्र देण्यात आले.

नातेपुते ( बारामती झटका )

नातेपुते ता. माळशिरस येथील राष्ट्रवादीचे निष्ठावान युवानेते पै. अक्षयभैय्या नितीन भांड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी निवड केलेले पत्र राष्ट्रवादी भवन येथे महाविकास आघाडी सरकारमधील सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख या उभयतांच्या शुभहस्ते देण्यात आले. यावेळी मोहित गायकवाड, प्रमोद बागल, केतन गिरमे, दीपक ढेकळे आदी मान्यवरांसह अनेक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातील अनेक नेतेमंडळींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता. माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांनीसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आलेला होता.

अशा अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे, जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्यावर प्रेम व निष्ठा ठेवणारे अनेक कार्यकर्ते होते. त्यापैकी युवानेते पै. अक्षयभैय्या भांड हे एक होते.
युवानेते अक्षयभैय्या भांड यांच्याकडे युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष पद होते. त्याकाळात त्यांनी माळशिरस तालुक्यात संघटन व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार तळागाळात पोहचवला होता.

लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी माळशिरस तालुक्यातील युवकांची फळी मजबूत करून अडचणीच्या काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू उचलून धरलेली होती. राष्ट्रवादीचे निष्ठावान असणारे पै. अक्षयभैया भांड यांचे अध्यक्षपद स्थानिक राजकारणातून काढून घेण्यात आले, तरीसुद्धा राष्ट्रवादीच्या विचारापासून तिळमात्र बाजूला न जाता देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख, यांच्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील निष्ठावान राष्ट्रवादीच्या नेते व कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी धडपड सुरू होती.

वरिष्ठ पातळीवरून पक्षाची निष्ठा व कार्य करण्याची धडपड त्यामुळे युवानेते पै. अक्षयभैय्या भांड यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव पदाची जबाबदारी दिलेली आहे. पै. अक्षयभैया भांड यांची निवड झाल्यानंतर माळशिरस तालुक्यात कार्यकर्त्यांनी अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचि. तेजस झंजे, मेडद आणि चि.सौ.कां. सानिका वाघमोडे, उंबरे (द.) यांचा शाही विवाहसोहळा संपन्न होणार
Next articleपिंपरी येथे कृषि विभागाची संयुक्त मोहीम संपन्न…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here