पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने पंढरपुरात आज ऐन दिवाळीच्या पाडव्या
दिवशी मोदी सरकार विरोधात आंदोलन केले. मागील अनेक दिवसांपासून घरगुती गॅस च्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या गॅस दरामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकारने गॅस चे दर कमी करावेत या मागणीसाठी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी युवतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना भाऊबीजेच औक्षण करून गॅस,पेट्रोल,डिझेल व वाढती महागाई कमी करून देशभरातील महिलांना भाऊबीजेची ओवाळणी द्या अशी विनंती केली.
यावेळी पंढरपूर शहर अध्यक्ष सुधीर भोसले, राष्ट्रवादी युवती प्रदेश संघटक चारुशीला कुलकर्णी, युवती जिल्हा अध्यक्ष श्रेया भोसले ,जिल्हा सचिव सुमैया तांबोळी,युवती जिल्हा सरचिटणीस नम्रता पाटील,जिल्हा संघटक राधा मलपे,पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष सारिका गायकवाड, करमाळा तालुका अध्यक्ष शीतल क्षीरसागर, पंढरपूर शहर कार्याध्यक्ष हर्षाली परचंडराव,मंगळवेढा शहर अध्यक्ष मुस्कान शेख,पंढरपूर तालुका उपाध्यक्ष ऋतुजा चव्हाण,वैष्णवी परचंडराव,श्वेता भोसले,महिला सेल च्या साधनाताई राऊत,शुभांगी जाधव,संगीता माने,सुनंदा उमाटे,वनिता बनसोडे, विध्यार्थी सेल चे सागर पडगल,ओंकार जगताप,युवकचे शुभम पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. अश्या अनोख्या आंदोलनानंतर तरी सरकार ने पेट्रोल डिझेल चे भाव कमी करावे अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng