पुणे (बारामती झटका)
राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कलम 5 संनियंत्रण समितीची बैठक पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या कार्यालयात सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा-2 चे लक्ष्मण बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. सुहासिनी घाणेकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक-1 गुन्हेशाखा विनायक गायकवाड, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक-2 गुन्हेशाखा प्रकाश खांडेकर, अन्न सुरक्षा अधिकारी अनिल गवते आदी उपस्थित होते.

सभेत मागील दोन वर्षाच्या कामकाजाचा आढावा व पुढील एक वर्षाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. राज्य तंबाखु नियंत्रण कक्षामार्फत तंबाखु, सुपारी, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास/ थुंकण्यास व धुम्रपानास (ई-सिगारेटसह) प्रतिबंध करण्याबाबत, स्वयंसेवी संस्था व पोलीस यांना प्रशिक्षण देण्याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng