मुंबई (बारामती झटका)
राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार निवारण (भारत) या संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या संपर्क प्रमुख पदी सुवर्णा माने यांची निवड करण्यात आली अशी माहिती राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश मीणा यांनी दिली. राष्ट्रीय मानवाधिकार येऊन भ्रष्टाचार निवारण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश मीणा, राष्ट्रीय महासचिव रमेश गंगणे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण कुमार चित्ते, उपाध्यक्ष अविनाश ढगे, युवा अध्यक्ष बाळासाहेब मदने, महाराष्ट्र प्रदेश सचिव नागेश्वर कदम, महाराष्ट्र अल्पसंख्यांक प्रमुख दस्तगीर इनामदार आदी मान्यवरांनी महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख पदी सुवर्ण माने यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे
सुवर्ण माने या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील सुस गावच्या रहिवाशी व कन्या असून निलसांस्कृती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून त्या काम पाहत आहेत. महिलांसाठी सबलीकरण, महिलांचे बचत गट, महिलांसाठी अनेक सामाजिक उपक्रम त्या राबवत असतात. आरोग्य शिबिर, गोरगरीब नागरिकांच्या हॉस्पिटलचा प्रश्न असेल अशा अनेक समस्यांच्या निवारणासाठी पुढे होऊन मदत करण्याचे काम करत असतात.

सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रातसह विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क असून पत्रकार क्षेत्रातील ही त्यांना अनुभव असल्याने अनेक सामाजिक उपक्रम राबवून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे मुळशी तालुक्यातील सुस गावातील नागरिकांसह, मुळशी तालुका व पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सुस गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी संघटना वाढीसाठी चांगले काम करून ह्या संघटनेच्या मार्फत अनेक सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यायचं काम करण्याचे सांगून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन राष्ट्रीय मानव अधिकार भ्रष्टाचार निवारण (भारत) संघटनेने त्यांची महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी निवड केली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng