महादेव जानकर यांनी उत्तर प्रदेशमध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शंभर उमेदवार विधानसभेला केले उभे
माळशिरस ( बारामती झटका )
राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर प्रदेश विधानसभा मतदार संघात शंभर उमेदवार निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनापती महादेवराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पाल यांच्या सहकार्याने निवडणुकीत उभे राहिलेले आहेत. सातारा जिल्ह्यातील पळसावडे गावच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील महादेव जानकर यांनी उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये शंभर उमेदवार विधानसभेला उभे केलेले आहेत. त्यांच्या या कार्याचे महाराष्ट्रामध्ये कौतुक केले जात आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेची ४०३ जागेची निवडणूक लागलेली आहे. देशामध्ये एक नंबरचे विधानसभेचे आमदार असलेले उत्तर प्रदेश हे राज्य आहे. या राज्यामध्ये महादेवराव जानकर यांनी शंभर जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार उभे केले आहेत. सदरच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, काँग्रेस आय, यांच्यासह अनेक पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत. सध्या उत्तर प्रदेश विधानसभेचे पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. उर्वरित दोन टप्प्यातील निवडणूका सुरू आहेत. दोन टप्पे संपल्यानंतर दि. १० मार्च २०२२ रोजी निकाल लागणार आहे.
जनतेचा सहभाग यामध्ये महत्त्वाचा आहे मात्र, निवडणूकीत सहभाग घेणे पक्षाचे काम असते. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा सरसेनापती महादेवराव जानकर यांनी शंभर उमेदवार उभे केले आहेत. निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्षाच्या मतदानामध्ये मतदारांचा टक्का वाढणार आहे. महादेवराव जानकर यांची भारतामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून ताकद आहे. निश्चितपणे भविष्यात महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष देशाच्या राजकारणात अग्रेसर राहिलेला पहावयास मिळणार आहे. महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रीय समाज पक्षाचे शिलेदार उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng