राष्ट्रीय समाज पक्षाच्या दिल्ली येथील ओबीसी आरक्षण मोर्चासाठी माळशिरस तालुक्यातील रासपचे कार्यकर्ते झाले रवाना‌…

माळशिरस (बारामती झटका)

राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा व महाराष्ट्राचे माजी दुग्धविकास मंत्री सर सेनापती महादेवराव जानकर यांनी ओबीसी आरक्षण गणना योग्य व्हावी, यासाठी दिल्ली येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने मोर्चा आयोजित केलेला आहे. सदर मोर्चासाठी माळशिरस तालुक्यातून हजारो कार्यकर्ते दिल्लीला रवाना झालेले असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष वैजनाथ पालवे पाटील यांनी बारामती झटक्याशी बोलताना सांगितले.

ओबीसी समाजाचे आरक्षण न्यायालयाने दिले आहे. न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रीय समाज पक्ष समाधानी आहे मात्र, चुकीच्या पद्धतीने अहवाल गेलेला असल्याने ओबीसी घटकावर अन्याय झालेला आहे. यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा व सर सेनापती महादेवरावजी जानकर यांनी तमाम कार्यकर्त्यांना हाक दिलेली आहे. आरक्षणाचा मोर्चा यशस्वी करण्याकरता माळशिरस तालुक्यातून हजारो कार्यकर्ते आपआपल्या सोयीनुसार दिल्ली येथे रवाना झाले आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleभारतीय जनता युवा मोर्चाच्या माळशिरस तालुका सरचिटणीस पदी फोंडशिरस गावचे युवा नेते तेजस गोरे यांची नियुक्ती
Next articleशोषित, उपेक्षितांच्या आग्रहाखातर डफळापूर जिल्हा परिषद मतदार संघातून ॲड.सौ. राजश्री अमोल पांढरे मैदानात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here