रासायनिक खतावरील १०% बचत भाग – ३, सरळ खताचा वापर – सतिश कचरे, मंडळ कृषी अधिकारी

नातेपुते (बारामती झटका)

रासायनिक खतावरील १०% बचतमध्ये सरळ खते म्हणजेच नत्र – युरिया, अमोनिअम सल्फेट स्फुरद – सिंगल सुपर फॉस्फेट, पालाश – म्युरेट ऑफ पोटॅश व सल्फेट ऑफ पोटॅश यांचा वापर व त्याचे फायदे खालील प्रमाणे आहेत.

१ – सरळ खतामध्ये निर्देशीत अन्नद्रव्ये प्रमाण टक्केवारी शाश्वत असते. २. सरळ खते संयुक्त व मिश्रखतापेक्षा १५% ने स्वस्त असतात. ३. सरळ खते सहज उपलब्ध होतात. ४. या खतामध्ये फिलर, क्षारचे प्रमाण कमी असते. ५. युरिया या सरळ खताला निंबोळी पावडर पेंडची प्रक्रिया केल्याने तो पिकाला हळूवार उपलब्ध होतो. उर्त्सजन व निचराद्वारे होणारा न्हास कमी होतो. ६. सिंगल सुपर फॉस्फेट शेणखत कंपोस्टमध्ये मिसळून दिल्यास अन्नद्रव्य उपलब्धता व उपयोगीता वाढते. ७. अमोनिअम सल्फेट हे नत्रयुक्त खत दिल्यास नत्राबरोबर सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्ये उपलब्ध होऊन जमिनितील बुरशीजन्य रोग प्रादुर्भाव रोखला जातो. संप्रेरके तयार करण्यास मदत व तेलबीयातील तेलाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. ८. माती परिक्षणावर आधारित अपेक्षीत उत्पादनासाठी पीक निहाय कृषि विद्यापीठ शिफारस मात्रा संयुक्त मिश्र खत विचार करता तंतोतंत देता येते. यामुळे पीकास अन्नद्रव्ये कमतरता व जास्त होत नाहीत. ९. एकात्मिक व समतोल खत मात्रामुळे खर्चाची बचत होते. व इतर अन्नद्रव्ये शोषणास विपरीत परिणाम होत नाही. १०. सरळ खताची उपयोगीता व कार्यक्षमता इतर खतापेक्षा जास्त असते. ११. पिकाची जमिनिची मुख्य अन्नद्रव्ये कमतरता व अन्नद्रव्य गरजेनुसार अन्नद्रव्ये सहज देणे शक्य होते. १२. पिकास व जमिनीस गरज नसताना संयुक्त व मिश्र खते याद्वारे दिली जाणारी अन्नद्रव्ये व त्यामुळे इतर अन्नद्रव्ये शोषणवर हानीकारक परिणाम टाळला जातो. १३. भात पिकाला नत्र अमोनिकल फॉर्म (स्वरूप) मध्ये लागते व शोषण केले जाते. त्यामुळे अमोनिअम सल्फेटमधून ते देता येते ते इतर मिश्र खत व संयुक्त खतामधून देता येत नाही. १४. कुकरबिटा फॅमीलीमधील कारले सर्व प्रकारचे भोपळे, दोडका या पिकाला म्युरेट ऑफ पोटॅश हे पालाश खत चालत नाही म्हणून सल्फेट ऑफ पोटॅश हे सरळ खत देता येते.

एकंदरीत वरील सर्व फायद्याच विचार करता सहज उपलब्ध होणाऱ्या इतर खतापेक्षा स्वस्त असणाऱ्या सरळ खताचा वापर केला तर १०% पेक्षा जास्त खर्चाची मात्राची बचत होऊन १० ते १५% उत्पादनात वाढ होते. उत्पादन खर्च कमी करून शाश्वत निर्देशित अनद्रव्येसह निव्वळ नफ्यात प्रमाण वाढविणेसाठी सरळ खताचा वापर करून १०% पेक्षा बचत करण्याचे आवाहन मंडळ कृषि अधिकारी नातेपुते कार्यालयाने केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleश्री संत ज्ञानेश्वर पालखी महामार्गावरील माळशिरस हद्दीतील ६१ फाटा येथील जे. एम. म्हात्रे कंपनीचे कार्य कौतुकास्पद.
Next articleChoosing an Antivirus security software Online

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here