रासायनिक खतावरील १०% बचत मोहीम भाग – २ विविध उपयुक्त जीवाणूचा वापर – सतीश कचरे मंडळ कृषि अधिकारी

नातेपुते (बारामती झटका)

कृषि पीक उत्पादनात बीज प्रक्रिया, लागवड साहित्य प्रक्रिया, ठिंबक द्वारे वापर, शेणखतामधून विविध सह सजयोग सहजीवी उपयुक्त जीवाणूचा वापर करून रासायनिक खत वापर मात्रा व खर्च यावर १०% पेक्षा जास्त बचत होऊन जैविक सुपिकतेसह उत्पादनात १५% पर्यत वाढ होते.

खालील जीवाणू कृषि विद्यापीठ, कृषि संशोधन संस्था, कृषि विज्ञान केंद्र व कृषि निविष्ठा केंद्रामध्ये अत्यल्प उदा. ८० रु. ते १०० रु. प्रति किलो व प्रति लिटरमध्ये उपलब्ध आहेत. खालील जीवाणू व त्यांचे कार्य व मात्रा खालीलप्रमाणे आहे – १) ऑझटोबॅक्टर – ज्वारी, बाजरी, मका, गहू, मिर्ची, वांगी, बीज प्रक्रिया २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे व ऊस लागवड साहित्यास, रोपे २५ ग्रॅम किंवा २५ मिली प्रति लिटर पाणी मधून प्रक्रिया. डाळींब, आंबा, पेरु या पिकास २ लि. प्रति एकर ठिंबक मधून देण्याची शिकारस आहे. यामुळे या पिकात हवेतील नत्र जमिनित स्थिर करण्यास मदत होते. २) अझोस्पिरिलीयम – या जीवाणूचा वापर मका व ज्वारी बियाणे २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे बीजप्रक्रिया करावी. ३) रायझोबीएम – द्विदल पीकासाठी सर्व प्रकारची द्विदल पिकासाठी त्यांचे गटानुसार भूईमुग, मुग, उडीद, तूर, हरभरा, चवळी पिक बियासाठी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणेसाठी प्रक्रिया करावी. मुळावर गाठी होऊन सहजीवन पद्धतीने हवेतील नग स्थिर करतात. ४) असिटोबॅक्टर – ऊस, बीट, ज्वारी, या शर्करा युक्त पिकासाठी २५ ग्रॅम किंवा २५ मिली १ लिटर पाण्यातून लागवड साहित्य प्रक्रिया करावी. यामुळे या पिकास ४० ते ५०% नत्राचा पुरवठा होतो. ५) स्फुरद विरघळणारे जीवाणू – आपल्याकडील जमिनीत स्फुरद भरपूर प्रमाणात असून तो स्थिर आहे व पिकास उपलब्ध नाही. या जीवाणूची सर्व पिके, भाजीपाला, फळपिके, फुले यांचे बीयाणे रोपे व लागवड साहित्यास २५ ग्रॅम किंवा २५ मिलीची प्रक्रिया करावी अथवा शेणखत ५० किलो व ठिंबकमधून २ लिटर प्रति एकर द्यावे. यामुळे जमिनीतील स्फुरद पिकास उपलब्ध होऊन खताची बचत होते.

६) कंपोस्ट जीवाणू – शेतातील पालापाचोळा, ऊस पाचट, गव्हू, काड, भात, तुस, बाजरी, सरमाड कुजविण्यासाठी याचा वापर करून या पिकाचे अवशेष मधील नत्र स्फुरद व पालाश उपलब्ध स्वरूपात पिकास मिळते. एकरी ५ किलो किंवा ५ लिटर ४०० लिटर पाण्यातून शिंपडणीसाठी वापर करावा. ७) पालाश विरघळविणारे उपलब्ध करून देणारे जीवाणू – आपल्या जमिनित पालाश भरपूर आहे व तो ९०% अविद्राव्य स्वरुपात आहे. हे २५ ग्रॅम किंवा २५ मिली जीवाणू प्रति लिटर पाणी किंवा २ लिटर प्रति एकर ठिबक सिंचनाद्वारे द्यावे यामुळे पालाश पिकास उपलब्ध करून दिला जातो. ८) मायक्रोरायझा – ही सहजीवी बुरशी असून यामुळे पिकाचा ताण सहन करणेची शक्ती, पाणी शोषन शक्ती वाढते. स्फुरद, फॉस्फरस खताचे वहन करण्याची क्षमता वाढून ३०% फॉस्फरस खताची बचत होते, ही सर्व पिकांना दिली जाते. ४ ते ५ किलो ५० किलो शेणखतामधून द्यावे. फळपिकासाठी १०० ग्रॅम १ किलो शेणखतामधून अथवा १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून द्यावे. ठिबकसाठी १०० ग्रॅम २० लिटर पाण्यातून द्यावी व फवारणीसाठी ५० ग्रॅम १०० लिटर पाण्याबरोबर देणेची शिफारस आहे. या सर्व जीवाणूची प्रक्रिया किटकनाशके बुरशीनाशके प्रक्रीया नंतर गुळाचे द्रावण व निळ १ ते २ थेंब टाकून करावी. सावलीत सुकवून पेरणी व लागवड करावी. शेणखतामधून व ठिंबक सिचनाद्वारे २ लि. प्रति एकर या प्रमाणात द्यावे. याप्रमाणे या उपयुक्त जीवाणूचा वापर केला तर खत मात्रा व खर्च यामध्ये कमीत कमी १०% पेक्षा जास्त बचत होऊन जैविक सुपिकतेसह १५% पेक्षा जास्त उत्पादनात वाढ होते. तरी शेतकरी बांधवांनी या जीवाणूचा वापर करून कमीत कमी खर्चात रासायनिक खत मात्रा व खर्च बचत करून अधिक उत्पादनासाठी वापर करावा. यासाठी व अधिक माहीतीसाठी नजीकच्या कृषि कार्यालयांशी संपर्क करण्याचे आवाहन मंडळ कृषि अधिकारी नातेपुते कार्यालयाने केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपुरंदावडे सोसायटीच्या निवडणुकीत मित्र सहकार पॅनलच्या 12 जागा तर श्री संत ज्ञानेश्वर माऊली पॅनलची एक जागा विजयी
Next articleपुरंदावडे सोसायटीवर मोहिते पाटील गटाची अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here