राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे परिवर्तनाची लाट निर्माण होणार – सौ. उर्वशीराजे मोहिते पाटील .

भारत देश राज्य, जिल्हा, तालुका स्तरावरील भाजपचे नेते व कार्यकर्ते यांच्या पायाखालची वाळू सरकली.

अकोला ( बारामती झटका )

काँग्रेसचे युवा नेते राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर 150 दिवसाचा भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात पातुर ते बाळापुर यात्रेत सहभागी झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याने राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे परिवर्तनाची लाट निर्माण होणार असून भारत देश महाराष्ट्र राज्य जिल्हा व तालुका स्तरावरील भाजपचे नेते व कार्यकर्ते यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे मत प्रतापसिंह मोहिते पाटील इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा युवा नेत्या सौ. उर्वशीराजे मोहिते पाटील यांनी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेनंतर बोलताना सांगितले.

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. पातुरपासून बाळापुरकडे भारत जोडो यात्रेत 14 किलोमीटर अंतर पायी चालत येताना यात्रेविषयी माहिती विचारली असता त्यांनी सांगितले. ठिकठिकाणी स्थानिक कार्यकर्ते यांचा उत्साह आणि आनंद पाहून स्वयंस्फुर्तीने आलेल्या सर्व सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर आनंद, भविष्यातील उज्ज्वल काळ दिसत असल्याच्या भावना प्रतापसिंह मोहिते पाटील इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा सौ. उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर जात वैधता प्रमाणपत्रावर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार.
Next articleवेळापूर ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here