पुणे (बारामती झटका)
जनतेस उत्तम दर्जाचा गुळ मिळावा व गुळ उत्पादकांनी चांगल्या दर्जाचे गुळ उत्पादन कशारितीन करावे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे 30 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता दौंड तालुक्यातील राहू येथे शिवशंभो मंगल कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत मार्क लॅब पुणे च्या डॉ. वसुधा केसकर आणि अन्न व औषध प्रशासनाचे विधी अधिकारी संपतराव देशमुख, हे अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व नियमने 2011 अंतर्गत व प्रचलित व अद्ययावत गुळ उत्पादनाविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ व्यवसायिकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व व्यवसायासाठी आवश्यक परवाने घेवूनच व्यवसाय करावा. यानंतरही संबंधितांनी परवाने घेतले नसल्याचे आढळल्यास त्यांच्या विरुद्ध कायद्यांतर्गत तरतुदीनुसार पुढील कार्यवाही घेण्यात येईल, असे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी कळविले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng