रिपब्लिकन पक्षाचे धुरंधर नेतृत्व राजाभाऊ सरवदे यांचे ‘चळवळीतील योगदान’ पुस्तक प्रकाशित करणार – बी. टी. शिवशरण

सोलापूर (बारामती झटका)

आंबेडकर चळवळीतील लढाऊ नेते रिपब्लिकन पक्षाचे धुरंधर नेतृत्व सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज आरपीआयचे राज्य सरचिटणीस तसेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा उजवा हात माझे प्रेरणास्थान लोकनेते राजाभाऊ सरवदे यांचे ‘चळवळीतील योगदान’ हे पुस्तक प्रकाशित करणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार बी. टी. शिवशरण यांनी दिली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानंतर रिपब्लिकन पक्ष अनेक गटातटात विखुरलेल्या अवस्थेत पहायला मिळतो. नेतृत्व वादावरून अनेक दलित नेत्यांनी आपल्या गटाच्या चुली वेगळ्या मांडल्या‌. दलित समाज दिशाहीन होऊ पहात आहे. मात्र, रामदास आठवले यांनी आपले गटाचे स्वतंत्र अस्तित्व, स्वाभिमान, अस्मिता शाबूत ठेवून समाज एकत्रित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालवला आहे. त्याच नेतृत्वाखाली सोलापूरचे वैचारिक खंबीर नेतृत्व करणारे व चळवळीतील शेकडो कार्यकर्त्यांना एकत्रित करून सामाजिक राजकीय चळवळ गतिमान करण्यासाठी आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे मजबूत संघटन करुन कार्यकर्ते युवा कार्यकर्ते यांची फळी मजबूत करणारे तसेच समाजातील अन्याय, अत्याचाराविरोधी प्रखरपणे लढा देऊन न्याय मिळवून देण्यासाठी आपले नेतृत्व गाजविणारे एकमेव धुरंधर नेतृत्व राजाभाऊ सरवदे यांचे ‘चळवळीतील योगदान’ हे पुस्तक प्रकाशित करणार आहे.

राजाभाऊ सरवदे यांच्या पन्नास वर्षांतील वाटचालीचा त्यांच्या विचारांचा परामर्श घेऊन त्यांचे अनुभव, संघर्ष, मार्गदर्शन यांवर आधारित त्यांचे सहकारी नेते कार्यकर्ते यांना भावलेले राजाभाऊ यांच्या प्रतिक्रिया राजाभाऊ सरवदे यांची प्रदीर्घ मुलाखत घेऊन एक दर्जेदार वैचारिक अभ्यासू पुस्तक प्रकाशित करणार आहे. कार्यकर्त्यांनी आपले अनुभव, आठवणी त्यांनी राजाभाऊ सरवदे यांचे नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनाची माहिती, छायाचित्रे पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleफडतरी गावाला प्रा. दुर्योधन पाटील यांच्या रूपाने गतिमान उपसरपंच मिळाला.
Next articleराज्यस्तरीय यल्बो बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या विद्यासागर महाजन याचा सत्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here