माळशिरस (बारामती झटका)
आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ जाणकार नेतृत्व म्हणून शामराव भोसले यांच्याकडे पाहिलं जातं. वयाच्या विसाव्या वर्षी दलित पँथरचे काम करत आपल्या सामाजिक, राजकीय वाटचालीस त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. अतिशय शांत, संयमी स्वभाव असलेले शामराव भोसले हे अन्याय, अत्याचार कुठं झाला की आक्रमक भूमिका घेत कठोर होतात. त्यांनी माळशिरस तालुक्यात तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक, राजकीय आंदोलनात सहभाग घेतला आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात त्यांनी अनेक वर्षे आक्रमक पवित्रा घेऊन तालुक्यात संघर्ष केला आहे. अनेकवेळा जातीय संघर्ष पेटला, त्यावेळी त्यांनी अंगावर जातीवादी, धर्मवादी काही लोकांच्या अंगावर लाठ्या खाल्ल्या आहेत. त्यांनाही तसाच प्रसाद दिला आहे. माळशिरस तालुक्यात दिन दलित बहुजन समाजाला न्याय, अधिकार, सन्मान देण्यासाठी शामराव भोसले यांचे प्रयत्न कामी आले आहेत. स्थानिक भुमीपुत्रांना श्रीपूर येथील दोन कारखान्यात नोकर भरती संदर्भात त्यांनी माळशिरस तालुक्यातील पुर्व भागांतून कारखान्यावर आरपीआयच्यावतीने भव्य मोर्चा काढला होता. त्यानंतर कारखाना व्यवस्थापन यांनी कारखान्यात टप्प्याटप्प्याने स्थानिक भुमी पुत्रांना नोकरी देणे सुरू केले आहे. आरपीआयचे नेते कार्यकर्ते एव्हढीच त्यांची मर्यादित ओळख नाही तर या तालुक्यातील समंजस, जाणकार, वडिलधारी नेतृत्व म्हणून ओळख आहे. अठरा पगड जातीतील अन्याय पिडीत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्नशील असतात. सर्व सामाजिक, राजकीय पक्ष संघटना यांचे नेते, कार्यकर्ते यांच्याबरोबर त्यांचे सलोख्याचे मैत्रीचे संबंध राहिले आहेत. श्रीपूर महाळुंग पुर्व भागात समाजकारण, राजकारण तसेच गावगाडा यामध्ये शामराव भोसले यांचा मोठा सहभाग असतो. या परिसरात कायम सामाजिक शांतता, सलोखा, बंधुभाव, एकात्मता रहावी यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करत असतात. विशेष म्हणजे पुर्व भागांतून कधीच दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा सुव्यवस्थेचा त्यांनी दुरुपयोग होऊ दिला नाही. तसेच जिथं खरोखरच दलित बहुजन समाजातील लोकांवर अन्याय अत्याचार झाला आहे, तिथं मात्र कायदेशीर कारवाई करण्यात ते कुठे कमी पडले नाहीत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब यांचे कट्टर समर्थक, विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. दलित पँथरच्या सुरुवातीपासूनच त्यांनी रामदास आठवले यांचे खंभीर नेतृत्व स्वीकारले आहे. एक पक्ष एक झेंडा एक नेतृत्व त्यांनी मानले आहे.
माळशिरस तालुक्यात ते सर्वपरिचित नेतृत्व म्हणून त्यांना डॅडी म्हटले जाते. गेली चाळीस वर्षे सामान्य माणूस ते सोलापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत त्यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांत आपले संबंध प्रस्थापित केले आहेत. कालपरवापर्यंत चळवळीत आलेले कार्यकर्ते पक्षाचे नावांवर पुढे कधी गेले, बंगला, गाडी, सोनंनाणं यात गुरफटून गेले, मात्र चाळीस वर्षे चळवळीत राहूनही माझी चटणी भाकरी बरी म्हणुन प्रामाणिक तसेच स्वाभिमानाने जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून तर ते समाजात ताठ मानेने स्वाभिमानाने वावरत असतात. त्यांच्या वाटचालीत कार्यकर्ते घडले, अनेक आंदोलने झाली, सामाजिक कार्यक्रम होत आहेत. त्यांचा एक जुन रोजी वाढदिवस असतो. त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या सान्निध्यात असणारे असंख्य कार्यकर्ते त्यांना सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी महाळुंग येथे गर्दीचा उच्चांक करत असतात. शामराव भोसले यांचे कार्य मोठे आहे. अनेक घटना प्रसंग लिहायची आहेत पण काही मर्यादा आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा…

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng