रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाची बैठक माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न…

पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बापूसाहेब धाईंजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होवून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व पक्षवाढी विषयी चर्चा

माळशिरस (बारामती झटका)

आज रविवार दि.07/8/2022 माळशिरस येथील गेस्ट हाऊस येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई मासिक आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीचे अध्यक्ष बापूसाहेब धाईंजे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हे होते. सदर बैठकीची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ‌. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून बैठकीस सुरुवात झाली.

यावेळी प्रमुख उपस्थिती श्रीकांत नानासाहेब सावंत महाराष्ट्र राज्य सचिव, दत्ता सावंत महाराष्ट्र राज्य संघटक तसेच माळशिरस तालुका अध्यक्ष आप्पासाहेब धाईंजे हे होते. यावेळी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात तसेच पक्ष वाढीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अनिता सुहास गायकवाड. यांची अल्पसंख्यांक माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. व खान मॅडम यांचाही प्रवेश करण्यात आला. चांद दस्तगीर मुलाणी व दिलावर चिखलगार यांचाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्यांक पक्षात प्रवेश करण्यात आला.

यावेळी माण तालुका अध्यक्ष दादासाहेब सरतापे, विकास सरतापे, भास्कर सरतापे, मुसा शेख, दलित मित्र भागवत गायकवाड, तालुका उपाध्यक्ष नानासाहेब तोरणे, नारायण समिंदर, प्रवीण वाघमारे जिल्हा सचिव नारायण पवार जिल्हा संघटक, निलेश धाईंजे तालुका कार्याध्यक्ष व पांडुरंग साळुंखे सुमित जवंजाळ आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर बैठकीचे सूत्रसंचालन श्रीकांत सावंत यांनी केले व कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार, डोंबाळवाडीचे जेष्ठ नेते महादेव केसकर यांची भाजपचे नूतन तालुका उपाध्यक्ष पदी निवड.
Next articleलोकनेते स्व. सूर्यकांतदादा यांना ८२ व्या जयंतीनिमित्त श्रीराजभैया माने पाटील यांच्याकडून अभिवादन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here