महाळुंग ( बारामती झटका )
केंद्रिय मंत्री संघर्षनायक मा.रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार व माजी राज्यमंत्री, लोकनेते राजाभाऊ सरवदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महांळुग – श्रीपुर, माळशिरस, नातेपुते नगरपंचायत पुर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचे तालुकाध्यक्ष प्रा. नरेंद्र भोसले यांनी सांगीतले. दि. 30/11/2021 तारखेपर्यत शहरध्यक्ष यांच्याकडे निवडणुक लढवु इच्छिणारे कार्यकर्ते यांनी आपले नाव, संपुर्ण माहिती पोच करावी 1/12/2021 तारखेला लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या सुचनेनुसार जिल्हा पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माळशिरस तालुक्यातील नगरपंचायत निवडणुकी संदर्भात पक्षाची भुमिका प्रसिध्दी केली जाईल. कागदपत्र काढण्यासाठी काही अडचणी येत असतील तर प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन माळशिरस तालुकाध्यक्ष प्रा.नरेंद्र भोसले (मो.9158681826) यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng