उस्मानाबाद (बारामती झटका)
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर अविरत काम करत त्यांच्या विचारांना जोपासणारी सामाजिक संघटना म्हणून रोहितदादा पवार विचार मंच करत आहे. त्यांच्या विचारांवर काम करणारे चीकुंद्रा गावचे सुपुत्र शशिकांत भीमाशंकर गायकवाड यांची उस्मानाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
शशिकांत गायकवाड हे पंचक्रोशीतील लोकांसाठी सतत कार्यरत असतात, त्यांच्या या कार्याची दाखल घेवून रोहितदादा पवार विचार मंच हे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजू बोंबले पाटील आणि प्रदेश कार्यध्यक्ष ॲड. अमोल पाटील यांनी शशिकांत गायकवाड यांची उस्मानाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती त्यांना काम करण्याची संधी दिली आहे. शशिकांत गायकवाड यांच्या नियुक्तीचे राजकीय, सामाजिक स्तरातून कौतुक केले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng