एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन बारामती ॲग्रो चे सर्वेसर्वा राजूदादा पवार, सौ सुनंदाताई पवार, आमदार रोहितदादा पवार यांचेकडून अभिनंदन
पुणे ( बारामती झटका )
कर्जत जामखेडचे कर्तव्यदक्ष युवा आमदार रोहितदादा पवार यांच्या सहकार्याने राजेंद्र उर्फ राजूदादा पवार व सौ. सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित दादा विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष राजू पाटील बोंबले यांनी बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चैनल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांची रोहित दादा पवार विचार मंचाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख पदी नियुक्ती केलेली आहे. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. अमोल पाटील, प्रदेश सचिव विनोद तार्डे, मच्छिंद्र गोरड सर, प्रदेश कोषाध्यक्ष प्रदीप घालमे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष समीर कुडची आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष राजू पाटील बोंबले, यांनी प्रसिद्धीप्रमुख श्रीनिवास कदम पाटील यांना दिलेल्या नियुक्ती पत्रा मध्ये. आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, रोहित दादा विचार मंचाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा चालवणारी तसेच राज्यात नेतृत्व करणारी, आदरणीय आमदार श्री रोहित दादा पवार यांनी त्यांच्या विचाराने ज्याप्रमाणे राज्यभर सामाजिक कार्य व जनसामान्य जनतेपर्यंत पोचवले व राज्यातील तळागाळातील सर्वसामान्यांचे हात बळकट केले त्याच प्रमाणे आपणही त्यांच्या पुढील वाटचालीस सामाजिक व राजकीय विधायक कार्य उत्तम प्रकारे व नियोजन बद्ध पद्धतीने साकार करावे ही शुभेच्छा असे नियुक्ती पत्र दिलेले आहे.

रोहित दादा विचार मंचाचे मार्गदर्शक ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट चे चेअरमन व बारामती ॲग्रो चे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते राजेंद्र उर्फ राजूदादा पवार, मार्गदर्शिका व समाजसेविका सौ. सुनंदाताई पवार, कर्तव्यदक्ष युवा आमदार रोहितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष राजू पाटील बोंबले यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Patil