पैठण (बारामती झटका)

रोहितदादा पवार विचार मंचच्या प्रदेश सचिवपदी विनोद तार्डे यांची निवड करण्यात आली आहे. विनोद तार्डे यांना कर्जत जामखेडचे आ. रोहितदादा पवार यांच्याहस्ते पैठण येथील कार्यक्रमात नियुक्ती पत्र देण्यात आले. विनोद तार्डे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.
संघटनेत काम करताना सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासह पक्ष – संघटन बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे विनोद तार्डे यांनी सांगितले आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष राजू पाटील बोंबले, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पल्लवीताई तार्डे, माजी आ. संजय वाघचौरे, संत एकनाथ शुगर लिमिटेडचे C.A. सचिन घायाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दत्ताभाऊ गोर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब निळम, माजी नगराध्यक्ष अनिल घोडके, अध्यक्ष राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तलमळे, तालुका अध्यक्ष प्रविण शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल वाघचौरे, रोहितदादा पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, तालुका अध्यक्ष अतुल बोरुडे, विशाल जयगुडे, लक्ष्मण लांडगे, आदित्य चव्हाण, गणेश वायकर, वैभव गणगे, प्रतिक भोज, ऋषिकेश कपटी, विजय घुले, संजय शिंदे, विलास जाधव, कुंदन तार्डे, मंगेश तार्डे, सुभाष भोजने, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng