रामायणातील राम लक्ष्मणाचा नातं आधुनिक युगात जपलं जातं.
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याकडे रयत क्रांती शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष, गोरडवाडीचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते लक्ष्मणतात्या गोरड यांनी गोरडवाडीचे ग्रामदैवत बिरोबा मंदिरास सभामंडपाची मागणी केलेली होती. आमदार फंडातून सभामंडपास सात लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे. लक्ष्मणाची गोरडवाडीतील बिरोबाची मागणी रामाने पूर्ण केलेली असल्याने रामायणातील राम लक्ष्मणाचा नातं आधुनिक युगात जपलं जात असल्याचा प्रत्यय माळशिरस विधानसभा मतदारसंघातील गोरडवाडीच्या बिरोबाभक्तांना व जनतेला आलेला आहे.

गोरडवाडी गावचे ग्रामदैवत बिरोबा मंदिर आहे. या मंदिरासाठी सभामंडपाची अडचण होती. आलेल्या भाविकांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे, हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून गोरडवाडीचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण तात्या गोरड यांनी लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्याकडे सभामंडपाची मागणी केलेली होती. बिरोबा मंदिराची यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते. नेहमी बिरोबा मंदिरात भाविकांचे अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. भाविकांची अडचण आणि लक्ष्मण तात्यांचा शब्द त्यामुळे आमदार राम यांनी सभामंडपास सात लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी राम यांना दिलेला शब्द लक्ष्मण यांनी पाळलेला होता.
सदर सभामंडपाचे भूमिपूजन गावातील ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्याहस्ते पूजन करून सभामंडपाचे काम सुरू झालेले आहे. त्यामुळे बिरोबा भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांना मतदार संघातील तमाम जनतेकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. रामायणातील प्रभू श्रीराम एक वचनी होते, त्याचाच प्रत्यय माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम यांच्या क्रुतीतून आलेला आहेत. अशा वचनपूर्ती करणाऱ्या आ. राम सातपुते यांना गोरडवाडीतील बिरोबा भक्तांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा येत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng