लवंग येथे युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष खरतडे यांनी युवा प्रतिष्ठानच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.


लवंग ( बारामती झटका )

लवंग तालुका माळशिरस येथील युवा प्रतिष्ठान च्या वतीने कोरोना संसर्ग रोगाच्या महामारी पासून जनतेची सुटका व्हावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी व कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी पोलीस पाटील तलाठी कोतवाल जिल्हा परिषद शिक्षक महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांचा कोरोना योद्धा सन्मान सोहळा संपन्न झाला.
लवंग पंचक्रोशी मध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी राहुल टिक प्रशांत पाटील जयकुमार केचे पाटील धनाजी चव्हाण सर प्रदीप कदम सनी पवळ धनंजय भोळे भोसले अमर चव्हाण अतुल पवळ रणजीत चव्हाण विनोद भोसले आदी पदाधिकारी यांनी लवंग पंचक्रोशी मध्ये कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्र लवंग यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाची प्रस्तावना राहुल टिक यांनी केली प्रस्तावना मध्ये अतिशय कठीण परिस्थितीत जनता असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स सफाई कामगार यांनी जनतेची कोरोना महामारी पासून सुटका केलेली आहे केलेल्या कामाचे गुणगौरव व्हावा यासाठी युवा प्रतिष्ठान च्या वतीने सन्मान सोहळा आयोजित केलेला असल्याचे सांगितले.


युवा प्रतिष्ठान च्या सन्मान सोहळ्याला उत्तर देताना किल्ल्यावरून गावचे पोलीस पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले आज पर्यंत आम्ही केलेल्या कार्याचे कौतुक करून आम्हाला भविष्यामध्ये जोमाने काम करण्याची ऊर्जा दिलेली आहे कोरोना काळामध्ये आम्ही जे कार्य केले ते आमचे कर्तव्य होते आमच्या सर्व कोरोना योद्ध्यांनी कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडलेले आहे. परिस्थितीनुसार कठोर निर्णय घ्यावे लागत होते विलगीकरणाची अंमलबजावणी करीत असताना कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता परंतु कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो कठीण काळात आपली मोलाची साथ मिळाली त्यामुळे आपण कोरोना सारख्या महाभयंकर रोगावर मात करू शकलो आम्ही केलेल्या कार्याचे मूल्यमापन युवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.


वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष खरतडे यांनी लवंग गाव तालुक्यामध्ये अग्रेसर आहे कोरोना काळात मृत्यूचा दर कमी होता अनेक लोकांचे लसीकरण केलेले असल्याने फायदा झालेला आहे अजून कोणी लसीकरण करायचे राहिले असतील त्यांनी लसीकरण करावे असे आवाहन करून युवा प्रतिष्ठानचे आभार मानले कार्यक्रमाचे आभार जयकुमार केचे पाटील यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते श्री शंकर साखर कारखान्याचा डिस्टीलरी इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ.
Next articleनाथासाहेब शेगर यांनी प्रतिकूल परस्थितीत समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केले. – ह.भ.प.प्रा. प्रसाद महाराज माटे चऱ्होलीकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here