लहानपणी आई-वडिलांच्या अंगाखांद्यावरून श्री काळभैरवनाथ यात्रेला येणाऱ्या रामाच्या हस्ते रथाचे पूजन व देवाची महाआरती

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते भांबुर्डीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रेत रथाचे पूजन व देवाची महाआरती संपन्न

भांबुर्डी ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी गावचे ग्रामदैवत काळभैरवनाथ देवाची यात्रा उत्साही व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. श्री काळभैरवनाथ यात्रेत मोठ्या प्रमाणात रथ उत्सव असतो. भांबुर्डी गावासह पंचक्रोशीतील भाविक या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असतात. नवसाचा व मानाच्या रथाचे पूजन भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याहस्ते होऊन देवाची महाआरती करण्यात आली. यावेळी गावचे आजी माजी सरपंच, यात्रा कमिटीचे सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


माळशिरस तालुक्याचे लोक प्रतिनिधी आमदार राम सातपुते यांचे आईवडील सौ. जिजाबाई व श्री. विठ्ठल सातपुते यांनी ऊसतोडणी मजूर म्हणून काम करीत असताना त्यांचे वास्तव्य भांबुर्डी येथे होते. पूर्वीपासून रुढी परंपरेने चालत आलेल्या श्री काळभैरवनाथ यात्रेला सर्व स्तरातील लोक भक्तिभावाने सहकुटुंब सहपरिवार येत असतात. लहानपणी आई जिजाबाईं यांच्या कडेवर आणि वडिल विठ्ठल यांच्या खांद्यावर बसून लहानपणी रथ उत्सवाचा लांबुन आनंद पाहणाऱ्या रामाला तालुक्याचे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मानाच्या रथाचे पूजन व देवाची महाआरती करण्याचा बहुमान मिळालेला आहे.

भांबुर्डी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते. यात्रा तीन ते चार दिवस चालत असते. चैत्र वैद्य सप्तमीस यात्रेला सुरुवात होते. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाच्या नियम व अटीमुळे यात्रा, जत्रा, सण, उत्सव यावर निर्बंध घातलेले होते. यंदाच्या वर्षी कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला असल्याने नियम व अटी शिथिल झालेल्या आहेत. त्यामुळे श्री काळ भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे मोठ्या प्रमाणात भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न झालेली आहे. राम सातपुते आमदार झाल्यानंतर अनेकवेळा त्यांना दर्शनाचा योग आलेला होता. मात्र यात्रेत मानाच्या रथाचे व देवाच्या महाआरतीचा पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीत बहुमान मिळालेला आहे. आई-वडिलांनी काबाडकष्ट केले. परिसरातील लोकांनी त्याकाळी भरभरून प्रेम केले, अशा लोकांची सेवा करण्याची संधी आमदार राम सातपुते यांना मिळालेली आहे. मिळालेल्या संधीचे लोकप्रिय दमदार आमदार सोनं करीत असल्याने जनता समाधानी आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसमाजप्रबोधनकार ह.भ.प.कुरळे. महाराज यांचे कै.जालिंदर मारुती डांगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुश्राव्य किर्तन
Next articleCreating A Progressive Web Application Pwa

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here