लहान वयातच मुलांमध्ये आत्मविश्वास व जिद्द निर्माण करणे काळाची गरज – मदनसिंह मोहिते पाटील

अकलूज (बारामती झटका)

शंकरनगर जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या मुलांनी दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेमध्ये मुलगा व त्याच्या आईचा जीव वाचवणा-या तीन मुलांचा सत्कार अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने-शेंडगे व केंद्र प्रमुख विठ्ठल नष्टे उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, सध्याचे युग हे मोबाईलचे युग असल्यामुळे सध्याची लहान मुले सतत मोबाईलच्या विश्वातच गुंग असतात. त्यामुळे त्याच्यांत आत्मविश्वास व जिद्द कमी होत असताना दिसत आहे. पुर्वीच्या काळी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लहान मुले आपल्या वडीलांबरोबर विहिरीत व ओढ्यात पोहायला जात असत. पण आता तो काळ राहिला नाही. ना आता ओढ्याला पाणी असते, ना विहीरीला उन्हाळ्यात पाणी असते. पालकांनी मुलांना अभ्यास व शाळा यामध्ये न जखडता त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना देणे गरजेचे आहे.

यावेळी शंकरनगरच्या महर्षी प्रशालेतील आठवीत शिकत असलेला रोहन हणमंत पाटोळे यांने आपल्या जीवाची पर्वा न करता पहिल्यांदा पाण्यात उडी मारून माय लेकरांचा जीव वाचवल्याबद्दल व त्याला मदत केलेल्या शंकरनगर जिल्हा परिषद शाळेतील सातवीत शिकत असलेला श्रेयस कृष्णा पाटोळे व पाचवी इयत्तेत शिकत आसलेला अभिजीत हणमंत पाटोळे यांचा शाल, फेटा, हार, श्रीफळ व मदनसिंह मोहिते पाटील यांनी स्वतः कडील प्रत्येक मुलास एक हजार रोख देवून त्यांचा सत्कार केला व त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षणाचा खर्च शंकरनगर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणार आहे.

दुर्घटनेतून वाचलेले आई ज्योती विजय शेळके त्यांचा मुलगा सोमनाथ विजय शेळके व तसेच घटनेच्या वेळी माय लेक बुडत असताना समय सुचकता ओळखून मदतीसाठी आरडा ओरडा करणा-या कु. हंसिका विजय पवार (इ. दुसरी) व कु. खुशी दिलीप वाणी (इ. पाचवी) यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक बंडू खडतरे, माळशिरस तालुका सोसायटीचे संचालक नवनाथ क्षीरसागर, शिक्षक नेते विठ्ठलराव काळे, श्रीमती इनशाद शेख, श्रीमती स्मिता जरे, श्रीमती कावेरी ढोले, सौ. भक्ती नाचणे, श्रीमती मनिषा चोपडे व सौ. कविता जाधव व श्रीमती भोसले मॅडम व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सोलापूर आणि नगर जिल्ह्याची निवडणूक प्रभारी जबाबदारी.
Next articleरशिया युक्रेन संघर्ष वाढलेले इंधन व खताचा किमंती व त्यावरील उपाय – हर्षविना पढारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here