लाखेवाडी येथील भवानी मातेच्या पावनभूमीमध्ये देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर सभा.

श्रीमंत ढोले सर यांची अनेक कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशासाठी जय्यत तयारी.

नीरा नरसिंहपूर (बारामती झटका)

लाखेवाडी ता. इंदापूर येथे देशाचे नेते मा. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर सभा रविवार दि. 3/4/2022 रोजी सकाळी 10 वा. व श्रीमंत ढोले सर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश व शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी चालु आहे.

लाखेवाडी येथील भवानी माता पावन भूमीमध्ये जय भवानी विकास प्रतिष्ठान संचलीत विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी या शैक्षणिक संकुलनाचा उद्घाटन सोहळा पद्मभूषण मा. खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब माजी केंद्रीय कृषी मंत्री भारत सरकार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, अध्यक्ष महिला राज रूपाली चाकणकर, इंदापूर तालुका अध्यक्ष हणुमंतराव कोकाटे, उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर आदिंसह अनेक तालुक्‍यातील सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन व श्रीमंत ढोले सर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश आणि शेतकरी मेळावा संपन्न होणार आसल्याचे जय भवानी विकास प्रतिष्ठानचे आध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांनी सांगितले.


श्रीमंत ढोले सर यांच्या पक्ष प्रवेशाबरोबर अनेक दिग्गज नेत्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत होणार आहेत. श्रीमंत ढोले सर यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर इंदापूर तालुक्यातील 22 गावांचा पाण्याचा प्रश्न सरांच्या माध्यमातून सुटण्याची अपेक्षा या भागातील शेतकरी राजा मेळाव्यात व्यक्त करीत आहे व सर्वच प्रश्न मार्गी लागतील. व तालुक्याच्या समीकरणात राष्ट्रवादीची काँग्रेस पक्षाची ताकद वाढेल. लाखेवाडी येथील विद्यालयांमध्ये वैद्यकीय व शेती महाविद्यालय याठिकाणी मिळण्याबाबत या भागातील पालक व विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. तसेच इंदापूर तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सरकार दरबारी सुटण्याचे चिन्ह व समिकरण होऊन चांगलीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये भर पडू लागलेली आहे. श्रीमंत ढोले सर यांच्या माध्यमातून या भागाचा विकास होणार हे दिसू लागले आहे.


लाखेवाडी विद्यालयामध्ये, वैद्यकीय व शेती महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मिळावे – पालक व विद्यार्थ्यांची मागणी.

श्रीमंत ढोले सर यांच्यासह अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी अरविंद लोंढे यांची निवड
Next articleशेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत 13 जागांसाठी 61 उमेदवारी अर्ज दाखल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here