लावणी लोककला ही महाराष्ट्राची परंपरा जपली पाहिजे – सौ. शितलदेवी मोहिते पाटील

अकलूज (बारामती झटका)

शिवरत्न फाउंडेशन व डॉटर्स मॉम्स फाउंडेशन व शिवरत्न प्रोडक्शन प्रस्तुत बालाजी निर्मित ‘तुमच्यासाठी काय पण’ या लावणी कार्यक्रमाचे आयोजन महिलांसाठी करण्यात आले होते. सांस्कृतिक क्षेत्राला उभारी देण्यासाठी लावणी ही महाराष्ट्राची पारंपारिक लोककला असून आजही जनसामान्यांना आपली वाटते. शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत लावणी फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षकांचे आजही या कलेच्या माध्यमातून मनोरंजन होत असते. आधुनिक युगात लोप पावत चाललेल्या लोककलांचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने तसेच समृद्ध लोककलेला व लोक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी शिवरत्न फाउंडेशन तर्फे लावणी या लोककलेचे आयोजन महिलांसाठी करण्यात आले.

या कार्यक्रमांमध्ये अकलूज लावणी स्पर्धेत सलग अकरा वर्षे विजेते तसेच 2018 अकलूज लावणी स्पर्धा प्रथम क्रमांक विजेता संघ यामध्ये सहभागी होता. बालगंधर्व पुरस्कार विजेते युवा लावणीसम्राज्ञी पूनम कुडाळकर, सोनाली यांनी विविध मराठी गाण्यांवर नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न लता मंगेशकर व थोर समाजसेविका अनाथांची माऊली सिंधुताई सपकाळ व कोरोना महामारी मध्ये दुःखद निधन झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविकपर मनोगतातून शिवरत्न फाउंडेशन डॉटर्स मॉम्स फाउंडेशन अध्यक्ष सौ. शितलदेवी मोहिते पाटील म्हणाल्या कि, लावणी लोककला ही महाराष्ट्राची परंपरा आहे ती जपली पाहिजे. अकलूजसारख्या कलेच्या क्षेत्रात लौकिक असलेल्या नगरीत असे लावणी कार्यक्रम लावणी कलावंतांना मोठे प्रोत्साहन देणारे ठरतात. कोरोना काळात लोककला सादर करणाऱ्या कलावंतांचे सादरीकरण बंद पडले. त्यामुळे आर्थिक संकट त्यांच्यावर आले. त्याची जाणीव ठेवून शिवरत्न फाउंडेशन व डॉटर्स मॉम्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून लावणी या लोककला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आपल्या महाराष्ट्राची प्रत्येक लोककला जपली पाहिजे, वाढली पाहिजे, यासाठी फाउंडेशन नेहमी प्रयत्नशील राहील. आज ओटीटी प्लॅटफॉर्म आलेले असताना सुद्धा लोककलेची गोडी विसरलेले नाहीत. लावणी कला प्रकार प्रत्यक्ष पाहतानाचा आनंद खूप मोठा आहे व तो आनंद आज होईल आणि मी हा कार्यक्रम घेतल्याने मला मनस्वी समाधान आहे. या कार्यक्रमात पुढे बोलताना म्हणाल्या कि, सामाजिक बांधिलकी व दृष्टीकोन असणारी ही स्त्री आपण स्वतः आरोग्याबाबत किती जागृत आहोत याचा विचार केला पाहिजे. आज आपल्या सगळ्या महिलांनी निरोगी आयुष्य कसे मिळेल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. डॉटर्स मॉम्स फाउंडेशन व शिवरत्न फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी, मोफत रक्त तपासणी व मोफत सोनोग्राफी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच अनेक महिलांना व गरजू मुलींना मोफत संगणक प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील व सौ. वैष्णवीदेवी मोहिते-पाटील यांची उपस्थिती होती. आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सोनोग्राफीसाठी मोलाचे सहकार्य लाभलेले वैद्यकीय क्षेत्रातील महिला डॉ. सविता गुजर, डॉ. अक्षता फडे, डॉ. रेवती राणे, डॉ. मानसी देवडीकर, डॉ. मानसी इनामदार, डॉ. अर्चना गवळी, डॉ. वैष्णवी शेटे, डॉ. प्रिया कदम, डॉ. मनीषा शिंदे, डॉ. प्रियंका शिंदे, डॉ. अर्चना माने, डॉ. सुमित चंदनशिवे, डॉ. प्राजक्ता साळवे, डॉ. देशमुख, डॉ. मनिषा शिंदे यांचा सन्मान डॉटर्स मॉम्स फाउंडेशन व शिवरत्न फाउंडेशनच्या अध्यक्ष सन्माननीय शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच यावेळी शिवरत्न प्रोडक्शन बालाजी निर्मित ‘तुमच्यासाठी काय पण’ चे निर्माता-दिग्दर्शक योगेश देशमुख, लावणी कलावंत बालगंधर्व पुरस्कार विजेते युवा लावणीसम्राज्ञी पूनम कुडाळकर व सोनाली यांचा सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमामध्ये शिवरत्न फाउंडेशन व डॉटर्स मॉम्स फाऊंडेशन या सामाजिक संस्थेमध्ये ‘लेक वाचवा लेक शिकवा’ व महिला सबलीकरणाच्या सामाजिक कार्यात समाजातील महिलांसाठी; समाजाच्या स्वास्थासाठी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल सौ. मोनाली त्र्यंबक गायकवाड यांची डॉटर्स मॉम्स फाऊंडेशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच हेमलता संजय रणनवरे यांची शिवरत्न फाऊंडेशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल सर्वांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून डॉ. तृप्ती गायकवाड स्टुडिओ डॉ. श्रद्धा साई सहारा मेडिकल अँड एज्युकेशन अकॅडमी यांनी आपले सादरीकरण केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleधैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते दोन भीम गीतांचे प्रसारण
Next articleडाळिंब दशा आणि दिशा भाग- ३ सतीश कचरे ‘मंडळ कृषि अधिकारी नातेपुते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here