लोकनेते स्व. जयसिंगराव जाधव यांचे चित्र रेखाटणारा पवनराजे जाधव याचा सन्मान…

जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब देहुकर महाराज, काँग्रेसचे नेते प्रकाशराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, डॉ. रामदास देशमुख यांच्या शुभहस्ते चित्राचे अनावरण व गुणगौरव.

मळोली ( बारामती झटका )

प्रगत शिक्षण संस्थेचे संस्थापक मळोली गावचे धाडसी व स्वाभिमानी नेतृत्व स्वर्गीय जयसिंगराव नारायणराव जाधव यांच्या जयंतीनिमित्त जनता विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे विविध कार्यक्रम घेण्यात आलेले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी मळोली ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रगतशील बागायतदार तानाजी मारुती जाधव यांचा नातू पवनराजे सुभाष उर्फ बापूराव जाधव याने लोकनेते स्वर्गीय जयसिंगराव जाधव उर्फ आबासाहेब यांचे चित्र काढलेले होते.

सदर चित्राचे अनावरण जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब देहुकर महाराज, श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाशराव पाटील, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. रामदास देशमुख, आदींच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माळशिरस पंचायत समितीचे गटनेते व विद्यालयाचे चेअरमन रणजीतसिंह जयसिंगराव जाधव, मळोली विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सत्यजितसिंह जयसिंगराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवनराजे जाधव याचा सन्मान जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प बापूसाहेब देहुकर महाराज यांच्या शुभहस्ते सन्मान करून हस्तकलेचे कौतुक करण्यात आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर विरुध्द मुंबई महापौर केसरी पै. भारत मदने यांच्यात होणार लढत
Next articleअकलूज ते म्हसवड व्हाया माळशिरस, सदाशिवनगर, जाधववाडी, कन्हेर, इस्लामपूर, मांडकी, जळभावीमार्गे जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या वाढवा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here